विदयुत रोहीत्र मधील तांब्याच्या तारा चोरणा-या आरोपीस केले जेरबंद
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर
महापोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ०१/११/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पोलीस अंमलदार असे हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार ताकवणे यांना मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन संशयीत इसम नामे अंशुमन राम केवल यादव, वय १९ वर्षे, रा. शिरुर बायपास रोड शिरुर, ता. शिरुर पुणे यास ताब्यात घेवुन युनिट ६ कार्यालय वाघोली येथे घेवुन येवुन त्याचेकडे ट्रान्सफॉर्मर / रोहीत्र मधील तांब्याच्या तारा चोरी बाबत विश्वासात घेवुन तपास करता त्याने वाघोली लोणीकंद भागात त्याचे साथीदारांसह रोहीत्रामधील तांब्याच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली. त्या प्रमाणे त्याच्यांकडे आधिक चौकशी करुन एकुण २,००,०००/-रु. कि.च्या रोहीत्रामधील तांब्याच्या तारा जप्त करुन मुद्देमाल ताब्यात घेवुन वाघोली पो.स्टे. कडील ०२ गुन्हे, लोणीकाळभोर पो.स्टे. कडील ०१ गुन्हा व लोणीकंद पो.स्टे. कडील ०१ गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण युनिट ६ यांचे सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ६ कडील सहा. पोलीस निरीक्षक राकेश कदम, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, विनायक साळवे, गिरीष नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

