उरूळी कांचन स्टेशन हद्दीत पोलीसांची अवैद्य गावठी हातभट्टी वाहतुक करणारे वाहनावर कारवाई. ११,१३,५००/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त
दत्ता म्हस्के पुणे प्रतिनिधी
उरूळी कांचन पोलीस स्टेशन
महापोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :- उरूळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत ०४/११/२०२५ रोजी पहाटे ०५:०० वा. चे. सु. सहा. फौजदार रमेश भोसले यांना माहीती मिळाली की, मौजे उरूळी कांचन ता. हवेली जि.पुणे गावचे हद्दीत सोलापुर पुणे हायवे रोडवरून गावठी हातभट्टीचे दारूची वाहतुक करीत घेवुन जात असताना एक पिकअप चा टायर फुटुन नादुरूस्त झाला असुन सदर वाहनामध्ये गावठी हातभट्टीची तयार दारू आहे. व सदर वाहनातुन दुसरे एका वाहनात पिकअप मधील दारूचे कॅन भरत आहेत अशी माहीती मिळाल्याने सदर बातमीची माहीती पोलीस ठाणे अंमलदार सहा. फौजदार रमेश भोसले यांनी लागलीच पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित असणारे पो हवा /९१७ सुनिल वाघमारे, पो.कॉ./३०२२ अशिष उल्हाळकर, पो. कॉ १७१६ ऋषीकेश रासकर, पो.कॉ./३५४ रविकुमार फड़ यांना सदर बातमीचा आशय समजावुन सांगुन पो. हवा. वाघमारे यांनी दोन पंचांना बोलावुन घेवुन सदर ठिकाणी जावुन बातमीची खात्री करून छापा कारवाई केली. पोलीसांना पाहताच दोन्ही वाहन चालक वाहने जागेवर सोडुन अंधारात पळुन गेले आहेत. सदर वाहणाची पाहणी केली असता खालील वर्णणाचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
१) ५,००,०००/- रू किंमतीचा एक पांढरे रंगाचा महींद्रा बोलेरो पिकअप त्याचा नंबर एम.एच.१२ एम.व्ही. ६९१६ जु. वा. कि.अं.
२) १,४०,०००/- रू किमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू असलले ३५ लिटर मापाची ३० कान्छे रंगाचे प्लास्टीकचे कॅन व १० निळे रंगाचे प्लास्टीकचे कॅन त्यामध्ये प्रत्येक कॅनमध्ये ३५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू अशी एकुण १४०० लिटर तयार दारू १००रू प्रति लिटर प्रमाणे पिकअप मध्ये मिळुन आलेले.
३) ४,००,०००/- रू किमतीचा एक पांढरे रंगाचा मारूती कंपनीचा सुपर कॅरी सी.एन.जी. टेम्पो तिचा नंबर एम.एच.१२ एस एक्स ७४३९ असा असलेले जुवा. किं.अं.
४) ७३,५००/- रू किमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू असलले ३५ लिटर मापाची १२ काळे रंगाचे प्लास्टीकचे कॅन व ०४ निळे रंगाचे प्लास्टीकचे कॅन, ०५ पिवळे रंगाची प्लास्टीकची कॅन त्यामध्ये प्रत्येक कॅनमध्ये ३५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू अशी एकूण ७३५ लिटर तयार दारू १०० रू प्रति लिटर प्रमाणे मारूती कॅरी वाहनामध्ये मिळुन आलेले. ११,१३,५००/- यांनी जप्त केला आहे येणे प्रमाणे वरील वर्णणाचा व किमतीचा मुद्देमाल पो.हवा. ९१७ सुनिल वाघमारे
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री संदीपसिंह गिल्ल सो, मा. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, श्री गणेश बिरादार सो, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, दौड विभाग श्री. बापुराव दडस सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सचिन वांगडे यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, सहा फौजदार रमेश भोसले, पो. हवा / ९१७ सुनिल वाघमारे, पोलीस अंमलदार रविकुमार फड, अशिष उल्हाळकर, ऋषीकेश रासकर, धनंजय भोसले यांचे पथकाने केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहा फौजदार रमेश भोसले हे करीत आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

