वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी ! रामटेकडी येथुन खुन करुन फरार झालेल्या ०३ अट्टल गुन्हेगारांच्या अहिल्यानगरयेथुन आवळल्या मुसक्या
आकाश पांचाळ सह संपादक
वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- रामटेकडी हडपसर पुणे येथे दिनांक २१/१०/२०२५ रोजी लक्ष्मीपुजन दिवाळी सनादिवशी रात्रौ ०९.३० वा. सुमारास फिर्यादी व त्यांचे नातेवाईक हे राहते घरी लक्ष्मीपुजन दिवाळी निमित्त एकत्र येवुन दिवाळी साजरी करीत असताना त्यांचे शेजारी राहणारे खन्नासिंग अजितसिंग कल्याणी यांचा मुलगा विधिसंघर्षीत बालक याने जाणीवपूर्वक फटाके फिर्यादी यांचे घराचे दिशेने उडविल्याने फिर्यादी यांचे नातेवाईक व खन्नासिंग अजितसिंग कल्याणी आणि त्यांचे इतर नातेवाईक यांचेमध्ये वाद झाला. त्यावेळी खन्नासिंग कल्याणी व त्याचा मुलगा विधिसंघर्षीत बालक आणि त्यांचे नातेवाईक जल्लुसिंग कल्याणी, जस्सुसिंग कल्याणी, अर्जुनसिंग कल्याणी, गोविंदसिंग कल्याणी व इतर यांनी सर्वांनी एकत्र येवून फिर्यादी व त्यांचे नातेवाईक यांना धारदार शस्वानिशी सज्ज होवुन त्यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने जातीवाचक शिवीगाळ करुन अमानुष मारहाण केली होती त्यामध्ये फिर्यादी यांचे नातेवाईक यश ठोसर, जितेंद्र परमेश्वर ठोसर व इतर हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांचेवर हॉस्पीटल मध्ये उपचार चालु असताना जितेंद्र परमेश्वर ठोसर यांचा मृत्यु झालेला आहे. त्यावरुन फिर्यादी यांनी वानवडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्याने वानवडी पोलीस ठाणे येथे सदरबाबत गु.र.नं. ४२७/२०२५ भा. न्या. सं. कलम ३१०, ७४, १०३, १०९, ११८(१), ११८(२), ११५(२), १८९(२), १९०, १९१(१), १९१(२), १९१(३), ३५२ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३. ७ तसेब अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ सुधारित अधिनियम २०१५ चे कलम ३(१) (आर), ३(१) (एस), ३(१) (डब्ल्यु), ३(२) (व्हीए) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यावरुन आरोपीत खन्नासिंग अजितसिंग कल्याणी व त्याचा मुलगा विधिसंघर्षीत बालक यांना वानवडी पोलीसांनी लागलीच अटक केले होते. परंतु उर्वरीत आरोपीत हे रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असल्याने ते गुन्हा करुन फरार झाले होते.
सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने वानवडी पोलीस ठाणे तपासपथक प्रभारी उमाकांत महाडिक व तपास पचकातील अंमलदार हे नमुद फरार आरोपीतांचा बातमीदारामार्फत व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करीत असताना काल दि. ०३/११/२०२५ रोजी पोलीस अंमलदार दिपक क्षीरसागर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रामटेकडी येथे मर्डर करणारे रेकॉर्डवरील ०३ गुन्हेगार हे रेल्वेने अहिल्यानगर येथे रेल्वेने येणार आहे. त्याप्रमाणे योग्य त्या पोलीस कार्यपध्दतीचा अवलंब करुन मा. वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व स्टाफ असे तात्काळ अहिल्यानगर येथे रवाना झाले होते. तेथे वर नमुद अधिकारी व स्टाफने अहिल्यानगर रेल्वे स्टेशन येथे सापळा रचुन रेकॉर्डवरील गुन्हेगार व दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे १) जलसिंग पिल्लीसिंग कल्याणी, २) गोविंदसिंग पिल्लीसिंग कल्याणी व ३) जसुसिंग पिल्लीसिग कल्याणी यांना नमुद स्टाफसह शिताफीने पकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही श्री. मनोज पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त सोो, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री. धन्यकुमार गोडसे, सहा.पो.आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर व श्रीमती अनुराधा उदमले, सहा. पोलीस आयुक्त सोो, वानवडी विभाग, पुणे शहर अतिरिक्त कार्यभार, श्री भाऊसाहेब पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री विजयकुमार डोके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वानवडी पो. स्टे. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, दिपक क्षीरसागर, विठ्ठल चोरमले, गोपाळ मदने, अभिजीत चव्हाण, विष्णु सुतार, अर्थद सय्यद, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, यतीन भोसले व अमोल गायकवाड यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

