वारजे माळवाडी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी ! पाच वर्षापासून स्थानबध्दता आदेशापासून स्वतःला वाचवणारा अट्टल गुन्हेगार वारजे पोलीसांकडुन जेरबंद


बालाजी शिंदे पुणे प्रतिनिधी
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर.
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०४ नोव्हेंचर २०२५ रोजी कोंबिंग ऑपरेशन राचयत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून चेकींग करून फरारी आरोपींना पकडने आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे डोजियर अपडेट करुन त्यांना योग्य ती समज देणेबाबत मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सुचना दिलेल्या होत्या, त्यानुसार वारजे पोलीसांनी वारजे आणि आजुबाजूच्या परिसरातुन वारजेत येणाऱ्या गुन्हेगारांच्या अनुशंगाने कसून तपासणी सुरु केली होती.
याकामी पोउपनि संजय नरळे यांच्या नेतृत्वात एक पथक नेमण्यात आले होते. त्यानुसार रामनगर, गोकुळनगर, म्हाडा, कर्वेनगर परिसरातील एकूण ५७ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाइाडती रात्रीमधुन घेण्यात आली. कोचिग ऑपरेशन सुरु असतानाच डी बी पथकातील अंमलदार गणेश शिंदे यांना माहिती मिळाली की, कोथरुड पोलीसांच्या रेकॉर्डवरील आरोपी नामे सुनिल नामदेव बनसोडे, रा. श्रीकृष्ण नगर, सागर कॉलनी, कोथरुड, पुणे याचेवर २०२१ सालीच तत्कालीन मा. पोलीस आयुक्त यांनी त्यास MPDA कायद्यातर्गत एक वर्ष स्थानबध्द करण्याचे आदेशीत केलेले होते. परंतु सदरचा आदेश निर्गमित झाल्यापासूनच नमुद आरोपी हा पसार झाला होता व स्वतःची अटक चुकवत होता आणि संभाव्य स्थानबध्दतेपासून स्वतःला वाचवत होता. तो वनदेवी परिसरात आल्याची माहिती मिळताच पोउपनि नरळे, पो.शि.१०३१४ गणेश शिंदे, पो.शि.५८५१ अमित जाधव यांनी सापळा रचून त्याला शिताफिने ताब्यात घेतले. सदर आरोपीला पुढील कायदेशिर सोपस्कार पार पाडणेकामी चारजे पोलीसांनी कोथरुड पोलीसांच्या हवाली केले. व कोथरुड पोलीसांनी कायदेशिर कार्यवाही करत स्थानबध्दता आदेशाची त्याचेवर बजावणी करून त्याला कारागृहात रवाना केले.
सुनिल बनसोडे हा एकेकाळी कुख्यात गैंगस्टर गजानन मारणे याचा लेफ्ट हॅन्ड समजला जायचा व त्याच्या सोवतीने अनेक गुन्ह्यांमध्ये तो सहभागी होता.
सदरची कारवाई ही मा.श्री संभाजी कदम, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ पुणे शहर, मा.श्री. भाऊसाहेब पटारे, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग वांचे सुचनेनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. प्रकाश धेंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश बडाख, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार गणेश शिंदे, अमित जाधव, योगेश वाघ, बालाजी काटे, निखील तांगडे, सागर कुंभार, शरद पोळ, सत्यजित लोंढे, अमित शेलार, अमोल सुतकर, वारजे माळवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केलेली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!