कोंढवा पोलीसाची धडाकेबाज कारवाई ! जॉय रायडिंगसाठी मोटार सायकल चोरी करणा-या विधी. बालक व आरोपी यांच्याकडुन ०९ मो.सा. कोंढवा पोलीसांकडुन जप्त


इम्रान शेख पत्रकार पुणे जिल्हा

कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, व त्यांचे पथक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार राहुल थोरात, सुहास मोरे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम हे खड़ी मशीन चौक ते उंन्ड्री चौक दरम्यान असणा-या धमार्वत पेट्रोल पंपाच्या गल्लीत काळे व निळे रंगाची पेंशन प्लस मोटार सायकल घेवुन उमे असुन त्याच्याकडील मोटार सायकलला नंबर प्लेट नाही. सदर मोटार सायकल चोरीची असल्याबाबत संशय आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने नमूद ठिकाणी कोंढवा पोलीस ठाणे कडील तपास पथक स्टाफ शोध घेणकामी गेला असता त्याठिकाणी दोन इसम हे त्याच्याकडील बंद पडलेली विना नंबर प्लेट मोटार सायकल चालु करित होते तेव्हा त्याच्याकडे असणारी मो.सा. चोरीची असल्याचा संशय वाटल्याने त्यांना दि.०७/०८/२०२४ रोजी ताब्यात घेवुन नाव व पत्ता विचारता ते विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे लक्षात आले.

Advertisement

तेव्हा त्याच्याकडे मिळुन आलेल्या मो.सा. बाबत चौकशी केली असता ते उडवाडवीचे उत्तरे देवु लागले तेव्हा त्यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याच्या ताब्यात मिळून आलेली पेंशन मो.सा.ही काकडे पॅलेस कर्वेनगर येथुन चोरी केली असल्याचे सांगितले त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी १) केटीएम २०० बुक मोटार सायकल के. एम.एच.१२के. के.०३०८, २) अॅक्टिव्हा मोटार सायकल
के. एम.एच.१३सी.एफ.०६५८, ३) अॅक्टिव्हा मोटार सायकल क्र.एम.एच.१२ एम.एच.२८७०, ४) अॅक्टिव्हा मोटार
सायकल क्र. एम.एच.१२टी.ई. ९४३२.५) पेंशन प्रो. मोटार सायकल क्र.एम.एच.१२जे.डी. ५०१८,६) डिओ मोटार सायकल के. एम.एच.१२ इ. झेड. ११९२, ७) अॅक्सेस मोटार सायकल क्र.एम.एच.१२ यु.ई. ३६२९.८) स्प्लेन्डर प्लस मोटार सायकल के. एम.एच.१२ जे. डब्ल्यु. २८८१ अश्या ९ मो.सा. आरोपी आकाश दिपक धनवटे, वय १९ वर्ष, रा. लोहगाव गुरुव्दारा कॉलनी लेन नं.१०, ता. हवेली जि. पुणे यांच्यासह चोरी केल्याची कबुली दिली. सदर गुन्हे हे विधी बालक यांनी मौजेसाठी चोरी केल्याचे उघड झाले आहे. विधी बालक व आरोपी यांच्याकडुन विमानगर पोलीस ठाणे कडील एकुण ०३, कोंढवा पोलीस ठाणे कडील ०४, वारजे माळवाडी पोलीस ठाणे कडील ०१, लोणीकंद पोलीस ठाणे कडील ०१ असे एकुण ०९ गुन्हे उघड होवुन ३,६०,०००/-रु कि मो.सा. जप्त करण्यात आलेल्या आहेत.

वरिलप्रमाणे कामगिरी ही मा. अमितेशकुमार साो पोलीस आयुक्त, मा.रंजन शर्मा साो, सह पोलीस आयुक्त, मा.मनोज पाटील, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. आर. राजा, पोलीस उप आयुक्त सो परि.०५, मा. धंन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोउपनिरी बालाजी डिगोळे, अंमलदार अमोल हिरवे, सुहास मोरे, राहुल थोरात, अभिजीत जाधव, राहुल रासगे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, विकास मरगळे, मयुर मोरे, अक्षय शेंडगे, अनिल बनकर यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!