महाराष्ट्र राज्यातील कारागृहात सन २०२४-२५ मध्ये विविध प्रकारचे पसतीस हजार झाडे लावण्याची स्वप्नपूर्ती होणार.


पंकेश जाधव संपादक 7020794626

Advertisement

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- जागतीक वाढते तापमान व प्रदुषणाच्या पार्श्वभुमीवर सर्व घटकांनी पृथ्वीच्या पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज निर्माण झालेली आहे व ही जबाबदारी ओळखुन महाराष्ट्र कारागृह विभाग देखील यासाठी सज्ज झालेला आहे. त्यासाठी, सन 2024-25 या वर्षामध्ये महाराष्ट्रातील कारागृहात वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत राज्यातील विविध कारागृहात एकुण वेगवेगळया प्रकारच्या जातीची 35,362 वृक्ष लागवडीचे उदीष्टे ठेऊन करून निसर्गाला हिरवा शालू घालण्याचे स्वप्न महाराष्ट्र कारागृहाने साकार करण्याचे ठरविले आहे. या अभियानाला राज्यभरामध्ये सामाजिक वनीकरण विभाग, पोलीस विभाग, सामाजिक संस्था, कृषी विद्यापीठ, वन विभाग, भारत पेट्रोलियम कं.ली. यांचे सहकार्य लाभणार आहे.
सध्या महाराष्ट्र राज्यात 31 कारागृहामध्ये शेती केली जात व कारागृह विभागाकडे शेतीसाठी एकूण 586.31 हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. त्यापैकी 320.22 हेक्टर क्षेत्र वाहितीखाली असून 171.11 हेक्टर क्षेत्र वनीकरणासाठी वापरण्यात येत आहे व या वनीकरण क्षेत्रामध्ये अगोदरच आंबा, चिंच, जांभूळ, आवळा, सिताफळ यासारखे फळझाडे, शेवगा, कढीपत्ता यासारखे भाजीपाला पिके तसेच साग, शिसम, पिंपळ, कापूर, करंज, कडूलिंब इत्यादी 85,151 झाडे आहेत. त्यामध्ये वाढ करुन पुन्हा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभागाने वृक्ष लागवडीस सुरुवात केली असून पावसाळा संपण्यापूर्वी वृक्ष लागवड पूर्ण करण्याचा मानस आहे. पावसाळ्यात वृक्षाची लागवड केल्यास त्याचे संरक्षण आणि संवर्धन होणे सोपे जाते. आंबा, चिंच, जांभूळ, आवळा, सिताफळ यासारखे फळझाडे, शेवगा , कढीपत्ता यासारखे भाजीपाला पिके तसेच साग, शिसम, पिंपळ, कापूर, करंज, कडूलिंब यासारख्या रोपांचा समावेश आहे. सदर वृक्ष लागवड कार्यक्रम मा. राधिका रस्तोगी, प्रधान सचिव (गृह विभाग), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात येत असून मा. प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून आणि मा. डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (मु.) कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली या वृक्षांचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र कारागृह विभागाने घेतली आहे. भविष्यात या रोपट्याचे महाकाय वृक्ष होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्याचा कारागृह विभागाचा मानस आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!