खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना अग्नीशस्त्रासह खडक पोलीसांनी केले जेरबंद.


पंकेश जाधव संपादक 7020794626

खडक पोलिस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत वाढते गुन्हयांना प्रतिबंधक घालण्याचे दृष्टीकोनातुन श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी सर्व पोलीस ठाणेना गुन्हे प्रतिबंधक व कायदा सुव्यवस्थेतेबाबत सूचना दिल्या आहेत. दिनांक ०७/०८/२०२४ रोजी खडक पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतियंधक पेट्रोलिंग तसेच संशयित इसम चेक करीत असताना पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे शुभम शिंदे याचेजवळ एक गावठी पिस्टल असुन तो व त्याचा साथीदार सेव्हन लव्हज चौक पुणे या ठिकाणी थांबलेला आहे. अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांना कळविले असता त्यांनी ती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशीकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शर्मिला सुतार यांना कळविले असता मा. वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पो.उप-निरी. प्रल्हाद डोंगळे, पोलीस हवालदार हर्षल दुडम, पो.हवा ठवरे, पो.ना नितीन जाधव, पो.शि ढावरे, पो.शि चव्हाण असे मिळालेल्या बातमीचे ठिकाणाचे जवळपास आडबाजुस खाजगी वाहन पार्क करुन सर्व स्टाफ बातमीचे ठिकाणी पायी पायी जावून, स्टाफचे मदतीने बातमीचे ठिकाणी वेगवेगळे पथक करुन सापळा रचुन पाहणी करता बातमीप्रमाणे इसम नामे १) शुभम शिंदे व त्याचा साथीदार हे सेव्हन लव्हज चौकाजवळ ब्रिजचे खाली शंकरशेठ रोड स्वारगेट पुणे याठिकाणी उभे असलेले दिसले त्यांची व स्टाफची नजरानजर होताच ते त्या ठिकाणाहून नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानच त्यांना स्टाफचे मदतीने पाठलाग करून काही अंतरावर त्यांना शिताफीने पकडून त्यास त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव १) शुभम अनिल शिंदे, वय २४ वर्षे, रा. दुर्गा माता मंदिराजवळ महर्षीनगर पुणे २) सिध्देश अशोक शिगवन, वय १९ वर्षे, रा. श्रीधर काळे सायकल मार्ट जवळ व्हेहिकल डेपो लगत गुलटेकडी पुणे असे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता शुभम अनिल शिंदे याचे पॅन्टमध्ये कंबरेस उजव्या बाजुस खोचलेले एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व त्याचे नेसते पेंटचे डाव्या खिशात ०२ जिवंत राऊंड मिळुन आले. तसेच सिध्देश अशोक शिगवन याचे पॅन्टमध्ये कंबरेस मध्यभागी खोचलेले एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व त्याचे नेसते पँटचे उजव्या खिशात ०१ जिवंत राऊंड मिळून आले. त्यांचेकडील दोन लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह त्याची प्रत्येकी किंमत ५५,०००/- रूपये व ०३ जिवंत राऊंड त्याची किंमत रुपये ३,०००/- किंमतीचा असा एकूण १,१३०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून त्यास दिनांक ०८/०८/२०२४ रोजी ०१/५५ या. अटक करण्यात आली असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री.अनिल सुरवसे हे करीत आहे. नमूद अटक आरोपी यांचेविरुध्द खालील गुन्हे दाखल आहेत.
१) स्वारगेट पोलीस ठाणे गु.र.नं. २१७/२०२१ आर्म अॅक्ट ४.२५ मपोअधि.३७(१) सह १३५ २) विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. ७७/२०२२ भादवि कलम ४५२,१४३,१४७,१४८.१४९..३२३.४२७ प्रमाणे

Advertisement

नमुद कारवाई श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, श्री. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे व श्रीमती नूतन पवार, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्री शशीकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती शर्मिला सुतार पोलीस निरीक्षक (गुन्हे). सहा. पो. निरी. श्री. अनिल सुरवसे, पो. उप-निरी. श्री. प्रल्हाद डोंगळे पोलीस उप-निरीक्षक, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, नितीन जाधव, लखन ढावरे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, समीर भोरडे, भालचंद्र दिवटे, कृष्णा गायकवाड, मयूर काळे, संतोष बारगजे, उमेश मरुपती, शेखर खराडे, यांचे पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!