मंगळसुत्र हिसकावुन घेवुन जाणा-या दोन आरोपीतांना २४ तासांच्या आत केले जेरबंद


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाइन पुणे :- दि.१२/१०/२०२५ रोजी डेक्कन पोलीस स्टेशन परिसरात प्रमात रोड येथे ६४ वर्षाच्या वयस्कर महिला पायी जात असताना दोन अज्ञात चोरटयांनी दुचाकीवरुन येवुन सदर वयस्कर महिलेच्या गळयातील हि-याचे पेंडंट असलेले सोन्याच्या चैनचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावुन नेले बाबत डेक्कन पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरुन गु.र.नं.१७१/२०२५ भा.न्या.सं.क. ३०४(२), ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस उप-निरीक्षक अजय भोसले यांच्या पथकामार्फत तात्काळ तपास सुरु केला. तपासा दरम्यान तपास पथकाचे पोलीस अंमलदार वसीम सिद्यीकी, संजय दंडगुले व संतोष सागर यांना गोपनिय बातमिदारामार्फत मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे १) जुल्फुकार वहीद शाह, वय ४० रा. सर्वे नं.८१२ यशवंत नगर खराडी, पुणे २) नसीम यामीन अन्सारी वय ४२ वर्षे, रा. लेन नं. २७, शिवनेरी नगर घर नं.०७ कोनकर बिल्डींग कोंढवा पुणे यांना २४ तासाचे आत निष्पन्न करुन दिनांक १३/१०/२०२५ रोजी दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीतांकडुन हि-याचे पेंडंट असलेले सोन्याच्या चैनचे मंगळसुत्र तसेच आरोपीतांनी गुन्हा करताना वापरलेली हिरो कंपनीची डीलक्स गाडी हस्तगत करण्यात आली असुन पुढील अधिक तपास सहा. पो. निरीक्षक गणेश जाधव नेम डेक्कन पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.राजेश बनसोडे, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-०१ पुणे शहर श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त. विश्रामबाग विभाग, पुणे शहर श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. प्रसाद राऊत यांच्या सुचनेप्रमाणे डेक्कन पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस उप-निरीक्षक अजय भोसले, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, धनश्री सुपेकर, वसीम सिद्दीकी, सागर घाडगे, संजय दंडगुले, संतोष सागर व गणेश सातव यांनी केलेला आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!