भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी ! ६४,०००/- रु. किं.चा. ३ कि. १९२.ग्रॅ. वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ केला जप्त
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दिनांक ११/१०/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार असे पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना ऐश्वर्या बैंक्वेट हॉलचे मागील बाजुचे निर्माण विवा सोसायटीकडे जाणाऱ्या रोडवर, आंबेगाव बु. पुणे येथे एक इसम हा त्याचे ताब्यामध्ये असलेल्या पोत्यामध्ये ६४,०००/- रु. किं. चा ३ कि. १९२ ग्रॅ. वजनाचा गांजा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळून आला असता त्याला तात्काळ ताब्यात घेवून नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शिवम तेजराव धोरण, वय २४ वर्षे, रा.जी.व्हि. सेव्हन सोसा. माऊंन्ट व्हिव बिल्डींग, आंबेगाव बु. पुणे. असे सांगितले असता त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ४६५/२०२५, एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २. पुणे शहर, श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर, श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, महेश बारवकर, मंगेश पवार, अभिनय चौधरी, सागर बोरगे व निलेश खैरमोडे यांनी केली केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव