खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखेची दमदार कामगिरी ! पिस्टल बाळगणाऱ्यास केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक 2 पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज रोजी पथकाकडील अंमलदार वानवडी पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिस अंमलदार खरात व पोलिस अमलदार घावटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत शिंदे वस्ती येथील बंद असलेल्या कॅनल वरील रोड वर हडपसर एक इसम गावठी बनावट पद्धतीचे पिस्टल सह उभा आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळताच त्यास स्टाफ च्या मदतीने ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अविनाश अजय मिसाळ वय 24 राहणार घोरपडी बाजार पोलीस चौकीच्या मागे घोरपडी पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची जवळ एक गावठी पिस्टल व एक जिवंत राऊंड अंदाजे किंमत रुपये 25,500/- मिळून आले आहे. सदर आरोपीवर आर्म अॅक्ट 3(25) ,मपोका क ३७(१)(३) सह१३५ प्रमाणे गुन्हा नोंद करत असून पुढील कारवाई कामी वानवडी पोलीस स्टेशन येथे ताब्यात देत आहोत.
नमूद आरोपीवर पर्वती पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 236/2022 भादवी कलम 395,307, नुसार गुन्हा दाखल आहे .
सदरची कामगिरी मा.अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे श्री. निखिल पिंगळे, मा.सहा. पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळीक गुन्हे 2, पुणे. यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक 2 पुणे श्री.विजय कुंभार व खंडणीविरोधी पथक दोन कडील पोलीस अंमलदार यांनी केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

