चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणा-या आरोपी पतीस केले जेरबंद
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– दिनांक ०६/१०/२०२५ रोजी लाडबा वस्ती, केसनंद ता.हवेली जि.पुणे येथील राहते घरी आरोपीची पत्नीला त्याचा पती नामे बिराप्पा शंकर खांडेकर वय ५० वर्षे रा. लाडबा वस्ती केसनंद याने चारीत्र्याच्या संशयावरुन शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडक्याने डोक्यावर व नाकावर मारुन गंभीर जखमी केले. सदरबाबत त्यांचा मुलगा याने दिलेल्या फिर्यादीवरुन वाघोली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५५१/२०२५ भा.न्या.सं.क. १०३.१०९,३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
नमुद गुन्ह्यातील जखमी महिला यांचा औषधौपचार दरम्यान मृत्यु झाला असुन नमुद गुन्ह्यात भा.न्या.सं.क. १०३ प्रमाणे कलम वाढ करण्यात आली आहे. दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार अशोक शेळके, पांडुरंग माने व महादेव कुंभार यांना कासारवाडी पुणे या ठिकाणी आरोपी असल्याबाबत माहिती मिळाली. त्यांनी सदर ठिकाणी जावुन तेथे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेवुन अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक वैजिनाथ केदार करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ४, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन श्री. युवराज हांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री आसाराम शेटे यांचे सुचनाप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक वैजिनाथ केदार, तपास पथक अधिकारी पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनीनाथ बोयणे व महादेव कुंभार यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव