घरफोडी करणा-या रेकॉर्डवरील सराईत आरोपींना २४ तासात केले जेरबंद


प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १. गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दिनांक १४/१०/२०२५ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे विश्रामबाग पोलीस स्टेशन, गु.र.नं. २८२/२०२५, भा.न्या.सं.क.३०५, ३३१ (४) या घरफोडी गुन्हयाचे समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार प्रदीप राठोड व रविंद्र लोखंडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी केलेले इसम हे गणेश पेठ दुधभट्टीजवळ असलेल्या गुरुद्वारा गेटच्या आतमध्ये थांबलेले आहेत.
सदर प्राप्त बातमीच्या अनुषंगाने नमूद गुन्हयाचे तपासकामी सहा. पोलीस निरीक्षक काकुखे व पोलीस अंमलदार यांनी नमुद ठिकाणी जावुन तपास केला असता नमुद आरोपी सदर ठिकाणी मिळुन आल्याने, त्यांना जागीच ताब्यात घेण्यात आले. त्यांना त्यांची नावे व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता १) मंगेश उर्फ सोन्या विजय चव्हाण, वय २८ वर्षे, रा. दारूवाला पूल दुधभट्टीजवळ, पुणे २) सागर उर्फ खापा दिलीप परदेशी, वय २० वर्षे, रा. एसआरए बिल्डींग, गणेश विकास मंडळासमोर, दुधभट्टीजवळ, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचेकडे २,४००/-रु. रोख रक्कम मिळुन आली असुन ती जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीतांकडे अधिक तपास करता, त्यांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील कारवाईकामी विश्रामबाग पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले.
तसेच वरील नमुद आरोपी नामे मंगेश उर्फ सोन्या विजय चव्हाण, वय २८ वर्षे, रा. दारूवाला पूल दुधमट्टीजवळ, पुणे याचेवर यापुर्वी एकुण १५ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे १, पुणे शहर श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत अन्नछत्रे, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १. सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार, बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, रविंद्र लोखंडे व गणेश ढगे यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!