मातीचोर गबरू जोमात व महसूल प्रशासन कोमात! ! कोरेगाव मूळ गावात अवैध माती उपसा कोणाच्या आशिर्वादाने ?
मातीचोर गबरू जोमात व महसूल प्रशासन कोमात! !!
प्रतिक्षा तायडे पुणे जिल्हा प्रतिनिधी
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोरेगाव मूळ उरुळी कांचन जिल्हा पुणे येथे गट नंबर ५०८ , ५०९/१ , ५०९/२ मधील मातीची चोरी राजरोस पणे सुरू . या भागातील मातीचे हजारो गाड्याची दिवस रात्र चोरी करून जोमात असल्याची घटना समोर येत आहे…
मातीचोरी महसूलच्या आशीर्वादाने सुरू असताना व संबंधित मातीचोरांची नावे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती असताना, अज्ञात माती चोरांच्या विरोधात गुन्हा कसा दाखल होऊ शकतो याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
त्यानंतर संबंधित तलाठी व वरिष्ठ अधिकारी यांना विनंती आहे की आपण पंचनामा करून अवैध माती उत्खनन करणारी वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर रितसर कारवाई करून त्याच बरोबर महसूलच्या अधिकाऱ्यांनी या मातीचोरावर कडक कार्यवाही करावी असी स्थानिक नागरिकांची मागणी आहे ….

मुख्य संपादक :- पंकेश जाधव