फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने सायबर फसवणुक करणा-या टोळीला भूज, गुजरात मधुन केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- यातील फिर्यादी यांना दि.१५/०१/२०२४ ते ०७/०२/२०२४ दरम्यान अनोळखी व्यक्तीने टेलिग्रामव्दारे संपर्क साधून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो असे सांगुन सुरूवातीला तक्रारदार यांना चांगला परतावा मिळवुन देवुन तक्रारदार यांचा विश्वास संपादून करुन त्यांचेकडुन मोठया प्रमाणावर फॉरेक्स ट्रेडिंग करिता २८,००,०००/- रुपये (२८ लाख रुपये) वेगवेगळ्या बँक खात्यावर प्राप्त करुन पैसे प्राप्त झाल्यानंतर तक्रारदार यांना नफा तसेच मुळ रक्कम परत न देता तक्रारदार यांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक झाल्यामुळे चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्र. १७५/२०२४ अन्वये कलम ४०९,४१९,४२०,३४ भादवि सह कलम ६६ सी, डी आयटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Advertisement

सदर गुन्हयाचे अनुषंगाने तक्रारदार यांचे फसवणुक झालेल्या पैशाबाबत तसेच बँक खाते धारकाबाबत माहिती घेतली असता सदरचा बैंक खाते धारक हे भूज, गुजरात या राज्यातील असल्याचे समजुन आले. सदर बँक खात्याला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांक व जीमेल आयडीची माहिती घेतली असता सदरचे मोबाईलचे लोकेशन व जीमेलच्या आयपी अॅड्रेसवरुन प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन हे भूज, गुजरात राज्यामधील येथील असल्याचे समजुन आल्याने सदर ठिकाणी चंदननगर पोलीस स्टेशन येथील सायबर पथकाचे पोउपनि रामेश्वर रेवले, पोलीस अंमलदार उकिर्ड, पानपाटील असे तपासकामी जावुन प्राप्त मोबाईल क्रमांकाचे लोकेशन नुसार सिटी ए डिव्हीजन पोलीस स्टेशन, भूज, गुजरात येथील स्थानिक पोलीसांची मदत घेवुन फसवणुक करणा-या मोबाईल धारक इसम नामे-१) नाकर रोनक आश्विनभाई वय-२८ वर्षे रा. कैलासनगर शिव मंदिर बाजूला एसटी वर्क शॉपजवळ भूज, गुजरात यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचे इतर साथीदार शहा मोहितकुमार दिनेशभाई, सोधा दिव्यराजसिंग अमरसंग, व इतर यांचे मदतीने सदर गुन्हा केल्याचे सांगितले. त्याचे साथीदार यांचा स्थानिक पोलीसांच्या मदतीने शोध घेतला असता आरोपी नामे २) शहा मोहितकुमार दिनेशभाइ वय-२७ वर्षे रा. वनिया व्यास अंगिया मोठा नखतराणा जिल्हा. कच्छ ३) सोधा दिव्यराजसिंग अमरसंग वय-२४ वर्षे रा. कोठारा ता. हावडासा जिल्हा. कच्छ हे मिळून आल्याने त्यांचेकडे विचारपुस करुन त्यांचा गुन्हयामध्ये सहभाग असलेबाबत निषन्न झाल्याने त्यांना नमुद गुन्हयात सिटी ए डिव्हीजन पोलीस स्टेशन येथे दि.१७/०७/२०२४ रोजी अटक केली.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उपआयुक्त परि ०४. विजयकुमार मगर मा. सहा पोलीस आयुक्त श्री. विठठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल माने यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रामेश्वर रेवले, उकिर्डे, पानपाटील, वानखडे, डहाळे, थोरात यांनी केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!