येरवडा महिला खुले कारागृहातील महिला बंदीकरिता मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले
पंकेश जाधव संपादक 7020794626
येरवडा महिला खुले कारागृह, पुणे
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा.श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे-०१ व श्रीमती स्वाती साठे कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा पुणे- ०६ यांचे आदेशान्वये आज दि.०५/७/२०२४ रोजी येरवडा महिला खुले कारागृह, पुणे येथे केंद्रिय मधुमक्षिका पालन संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, खादी आणि ग्रामउद्योग आयोग सुक्ष्म लघू एवंम मध्यम मंत्रालय, भारत सरकार, शिवाजीनगर, पुणे यांचे मार्फत येरवडा महिला खुले कारागृहातील महिला बंदीकरिता मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण पूर्ण केलेबाबतचे प्रमाणपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला,
येरवडा महिला खुले कारागृहातील शेती विभागात काम करणा-या महिला बंद्यासाठी दि.१/०७/२०२४ ते ५/०७/२०२४ असे ०५ दिवसांचे मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये एकुण-२२ महिला बंदी सहभागी होत्या. यामध्ये मधुमक्षिकांचा जीवनक्रम, कामाचे स्वरुप, मधुमक्षिका पेटी हाताळणे तसेच मध काढणे व मधुमक्षिका पालना पासून मिळणा-या मध व इतर उत्पादनाचे बाजारपेठेतील विक्री बाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली. सदरचे प्रशिक्षण हे सीबीआरटी, पुणे येथील प्रशिक्षक श्री.बी. के. चव्हाण, श्री. आटपाडीकर, श्री. राहुल काळे, श्रीमती. गौरी चव्हाण, श्रीमती. श्रुती कुंभार, श्रीमती. साक्षी शिंदे, श्रीमती. मल्लमा माळी यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
आज रोजी सीबीआरटी, पुणे या संस्थेचे संचालक श्री. बसवराज व श्री. सुनिल ढमाळ अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह, यांच्या हस्ते सहभागी महिला बंद्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास श्री. सुनिल ढमाळ, अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे, श्रीमती पल्लवी कदम, उपअधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे, सीबीआरटी संस्थेचे श्री. यशवंत डेकाटे, सहाय्यक संचालक, श्री बी. के. चव्हाण, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, श्री. संजय पुरी, प्रशिक्षण समन्वयक व श्री. मयेकर, श्रीमती. आर.ए. खिलारी महिला तुरुगाधिकारी-श्रेणी-२, श्रीमंती. पौर्णिमा पालोदकर, तुंरुगाधिकारी श्रेणी-2 उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रीमती. शितल गावडे, कृषी सहाय्यक यांनी केले.
तसेच श्रीमती पल्लवी कदम, उपअधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे यांनी कारागृह प्रशासनातर्फे केंद्रिय मधुमक्षिका पालन संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे आभार मानले

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

