दिवसा घरफोडी चोरी करणारा अट्टल चोरास गुन्हे शाखा युनिट-५ ने अटक करुन सदर आरोपी कडुन २१.४१ तोळे सोन्याचे दागिने जप्त करुन ०६ घरफोडी चोरीचे गुन्हे केले उघड.


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा, युनिट ५ पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- तळेगाव एम.आय.डी.सी.पो.स्टे.गु. रजि.नं.१३४/२०२४ भा.दं.वि.क. ३८०,४५४ या गुन्ह्याचा समांतर तपास मा. वरिष्ठांच्या आदेशा प्रमाणे गुन्हे शाखा युनिट ५. पिंपरी चिंचवड कडून चालू होता. दाखल गुन्ह्यातील घटनास्थळावरुन प्राप्त सी.सी.टी.व्ही. फुटेजचे आधारे संशयित इसम हा रेकॉर्डवरिल सराईत घरफोडी चोरी करणारा आरोपी सुदर्शन विष्णूकांत चंद्रपाटले रा. वडवळ (नागनाथ) ता. चाकूर जि. लातूर हा असल्याचे निष्पन्न करुन सदर आरोपीचा शोध घेत असतांना असतांना पोशि/२५७१ श्यामसुंदर गुट्टे व पोशि/४९९ भरत माने यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील घरफोडी चोरी केलेला संशयित इसम हा रावेत पोलीस स्टेशन हद्दीत जुन्या मुंबई पुणे हायवेलगत पुण्याचे दिशेने जाताना किवळे ब्रीज संपल्यानंतर सर्व्हिस रोडला थांबला आहे. अशी माहिती मिळताच वपोनि सुहास आव्हाड तसेच पोउप-नि राहुल कोळी, पोहवा / ७१८ दत्तात्रय बनसुडे, पोशि/२५७१ श्यामसुंदर गुट्टे, पोशि/४९९ भरत माने, पोशि १३०५ दयानंद खेडकर असे तात्काळ खाजगी वाहनाने रवाना होवून मुकाई चौकातून किवळे ब्रीजजवळून पुण्याचे दिशने सर्व्हिस रोडने जात असता किवळे ब्रीज संपल्यानंतर लगेच रस्त्याचे कडेला सदर गुन्ह्यातील संशयित इसम आरोपी नामे सुदर्शन विष्णूकांत चंद्रपाटले दिसला आम्ही गाडी त्याचेजवळ थांबविली व गाडीतून उतरुन त्याचेकडे जाताच तो पळून जावू लागल्याने त्याला सोबतच्या पोलीस पथकाचे मदतीने शिताफीने ताब्यात घेतल व त्यास त्याचे नाव, पता विचारता त्याने त्याचे नाव सुदर्शन विष्णूकांत चंद्रपाटले वय ३० वर्षे, रा. वडवळ (नागनाथ) ता. चाकूर जि. लातूर असे सांगितले, त्यास दाखल गुन्ह्याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने त्याला गुन्हे शाखा, युनिट ५ देहूरोड चे कार्यालयात आणून त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यास गुन्ह्याचे तपासकामी अटक करुन त्याचेकडे इतर ठिकाणी गुन्हे केले आहेत का याबाबत सखोल तपास केला असता त्याने तळेगाव दाभाडे, कामशेत, हिंजवडी, शिक्रापुर, सातारा शहर येथे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडुन मेंमोरंडम पंचनाम्याने २१०.४१ ग्रॅम
(२१.४१ तोळे) वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

Advertisement

 

१) तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गु.र.नं. १३४/२०२४ भा.दं. वि.क. ४५४, ३८०
२) तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु.र.नं. ४०/२०२४ भा.दं.वि.क. ४५४, ३८० ३
) सातारा शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३८/२०२४ भा.दं. वि.क. ४५४,३८० ) शिक्रापुर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५८३/२०२४ भा.दं.वि.क. ४५४,३८०
४ ५) कामशेत पोलीस स्टेशन गु.र.नं. १३७/२०२४ भा.दं.वि.क. ४५४,३८०
६) हिंजवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. १३८७/२०२३ भा.दं.वि.क. ४५४,३८०
आरोपी नामे सुदर्शन विष्णूकांत चंद्रपाटले सध्या रा. पुणे फिरस्ता मुळ रा. वडवळ (नागनाथ) ता. चाकूर जि. लातूर याच्यावर यापूर्वी दाखल असलेले गुन्हे.
१) लातुर एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९४/२०२२ भा.द.वि.क. ४५४,३८०
२) चाकुर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४०३/२०२२ भा.द.वि.क. ३२४,३२३,५०६,३४
३) विवेकानंद पोलीस स्टेशन लातुर गु.र.नं. ३०६/२०१९ भा.द.वि.क. ३९२,४५२ ) अहमदपुर पोलीस स्टेशन गु.र.नं. २३/२०१४ भा.द.वि.क. ४५७,३८० ४
) पिंपरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ५४७/२०१५ भा.द.वि.क. ३९९,४०२, आर्म अॅक्ट ४ (२५) ३७ (१) (३) सह १३५ ५
६) ७)
पिंपरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४५५/२०१५ भा.द.वि.क. ४५४,३८०,४१३,३४
८) पिंपरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ५४७/२०१५ भा.द.वि.क. ३९९,४०२, आर्म अॅक्ट ४ (२५) ३७ (१) (३) सह १३५
पिंपरी पोलीस स्टेशन गु.र.नं. १००/२०१५ भा.द.वि.क. ४५४,३८०,४१३,३४
९) अकोला पोलीस स्टेशन गु.र.नं. ०२/२०१५ भा.द.वि.क. ४५४,४५७,३८०,३४ १०) भोसरी पोलीस स्टेशन गु.र.नं. २८३/२०१५ भा.द.वि.क. ४५४,३८०
११) भोसरी पोलीस स्टेशन गु.र.नं. १००/२०१५ भा.द.वि.क. ४५४,४५७,३८०
१२) चाकुर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६२/२०१२ भा.द.वि.क. ३९२,३४
१३) शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातुर गु.र.नं. १२/२०१५ भा.द.वि.क. ४५४,४५७,३८०
१४) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. १२१/२०२४ भा.द.वि.क. ४५४,४५७,३८०
१५) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. १४५/२०२४ भा.द.वि.क. ४५४,४५७,३८० १६) चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.नं. ९४०/२०२४ भा.द.वि.क. ४५४,४५७,३८०
१७) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १०१/२०२४ भा.द.वि.क. ४५४,४५७,३८०

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो., मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो., मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, संदीप डाईफोडे सो., सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. विशाल हिरे सो., यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व सुचनाप्रमाणे श्री. सुहास आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५, यांचे मार्गदर्शनाखाली पोउप-नि राहुल कोळी, पोहवा ७१८ बनसुडे, पोशि/२५७१ श्यामसुंदर गुट्टे, पोशि/४९९ भरत माने, पोशि १३०५ खेडकर, यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!