गुन्हे शाखा युनिट ६ ची उलेखनीय कामगिरी !जबरी चोरीसह दुखापत करणारा पाहिजे आरोपी घेतले ताब्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:– आज रोजी कक्ष ६ हद्दीमध्ये स.पो. नि. कांबळे, पो.ना. मुंढे ,पो.हवा. सकटे व कारखिले असे निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हे प्रतिबंधक जास्त करीत असताना माहिती मिळाली कि, हांडेवाडी रोड या ठिकाणी जुलै, २०२४, मध्ये ४ इसमांनी एका रिक्षाचालकास जबर मारहाण करून त्याचेजवळची रोख रक्कम जबरीने घेऊन गेलेने कोंढवा पो.ठाणे येथे गु.र. नं. 824 /2024, 309 (6), 3 (5) याप्रमाणे गुन्हा नोंद आहे आणि नमुद गुन्ह्यातील निष्पन्न पाहिजे आरोपी नामे मोहित रवी शेलार, वय, 19 वर्ष रा. श्रीराम चौक, हडपसर, पुणे हा साई मंदिर चौक, काळेपडळ, हडपसर, पुणे येथे उभा आहे. वर नमूद पथकाने सदर ठिकाणी जाऊन वर नमूद आरोपितास पळून न जाता शिताफीने ताब्यात घेतले आहे. गुन्हा घडल्यापासून नमूद आरोपी हा फरार होता .
नमूद आरोपीताची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई करिता कोंढवा पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे .
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पो. हवा. बाळासाहेब सकटे , पो.ना. नितीन मुंढे,कारखिले यांनी केली आहे

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

