फरासखाना तपास पथकातीची उल्लेखनीय कामगीरी ! रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडुन एक पिस्टल, ०२ जिवंत काडतुस, असा घातक अग्निशस्त्र हस्तगत”.


पंकेश जाधव संपादक 7020794626

फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी विधानसभा निवडणुक तसेच आचार संहिता दरम्यान काहीएक अनुचित प्रकार घडु नये यासाठी पुणे शहरातील खुन, खुनाचा प्रयत्न, रॉबरी, तसेच पाहीजे फरारी, तडीपार आरोपीचा शोध घेवून रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेकींग करण्याबाबत महत्वाच्या सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने फरासखना पोलीस स्टेशन प्रभारी श्री प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी व पोलीस अमंलदार यांना महत्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यादरम्यान तपास पथकातील पोलीस अधिकारी श्री वैभव गायकवाड, अरविंद शिंदे व पोलीस अंमलदार पी. वाय . ५९०६ नांगरे, पो हवा २१९२ तेलंगे, पो. हवा. ६४४२ स्वामी, पो.हवा. ६७२ पासलकर, पो. ना. ७७०६ राठोड, पो. शि.८४०३ सोनूने पो शि.८१८३ जाधव यांचेसह फरासखाना पोलीस स्टेशन भागातील बुधवार पेठ अशा संवेदनशिल मागास प्रतिबंधात्मक पापी पेट्रोलिंग करीत असतांना तपास पथकातील पोलीस अमंलदार नितीन तेलंगे व वैभव स्वामी यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आखाडे तालीम समोर, ढमढेरे गल्ली पूर्ण येथे एक इसम घातक अग्निशस्त्र घेवुन उभा असल्याबाबत खात्रीशीर बातमीद्वारे इसम नागे १) अवधुत शंकर फडतरे वय ३२ वर्षे, रा. ९४६ कसबा पेठ, संत रोहिदारस नगर, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एक गावठी पिस्टल मॅगझीनसह व ०२ जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्याने विना परवाना घातक अग्निशस्त्र जवळ बाळगल्या मुळे अटक करुन, पोलीस कोठडीदरम्यान त्याचा रेकॉर्डवरील मित्र २) आकाश चंद्रकांत डोके वय ३२ वर्षे, रा. १०७० कसबा पेठ पुणे याने आरोपी क्रमांक ५ याचे जवळ ठेवण्यासाठी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील अटक आरोपी हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त परि-१,संदिपसिंह गिल, सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती नुतन पवार, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे, पो.नि. (गुन्हे) श्री. अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप-नि. अरविंद शिंदे, सपोफौ, मेहबुब मोकाशी, पोलीस अमंलदार, तानाजी नागरे, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, महेश राठोड, विशाल शिंदे, नितीन जाधय, गजानन सोनुने, समिर माळवदकर, सुमित खुट्टे. संदिप कांबळे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर, यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!