मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत दोन आरोपींना गुन्हे शाखेने ७२ तासात केले अटक
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
मालमत्ता गुन्हे विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिघी, आंळदी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २१/०२/२०२५ रोजी व दिनांक २२/०२/२०२५ रोजी ही प्राईड वल्ड सिटी चहोली गाव परीसरात पहाटे सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या ०८ नागरिकांना व पुणे ग्रामीण हद्दीत ०१ व पुणे शहरातील ०५ नागरिकांना तीन इसमांनी चोरीच्या मोटार सायकल वर येवुन चाकुचा धाक दाखवुन त्याचे कडील मौल्यवान वस्तु जबरीने हिसकावुन नेल्या होत्या त्यावर सदर घटनेबाबत तात्काळ दिघी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.७५/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९ (६) गु.र.नं.७७/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९ (६) व आळंदी पोलीस ठाणे गु.र.नं.७५/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९ (६) गुन्हे दाखल करण्यात आले. सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन मा. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी सदर आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यावर मा. पोलीस उपायुक्त गुन्हे श्री संदीप डोईफोडे व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-०१ डॉ. विशाल हिरे यांनी गुन्हे उघडकीस आणेबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार गुन्हे शाखेचे मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, खंडणी विरोधी पथक, व युनिट ०३ चे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरु केला त्याकरता त्यांनी सतत ०३ दिवस अहोरात्र मेहनत घेवुन आरोपीच्या येण्याजाण्याच्या रत्यावरील सीसीटीव्हीची पाहणी करुन आरोपी निषन्न केले. सदर निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना पोलीस उप निरीक्षक भदाणे व पोलीस उप निरीक्षक गोसावी तसेच पोलीस अमंलदार पोलीस हवा १२३६ मोरे, पोहवा १७४८ गडदे, पोहवा १५७२ जाधव, पोहवा ८०१ पोटे, पोहवा ८८१ गोडांबे, पोना १७२२ कोकणे, पोशि २८६५ कदम यांना चहोली परिसरात सदर आरोपी सशंयीत रित्या फिरताना दिसुन आले. सदर पथकाने आरोपीचा चिंतथरारक पाठलाग करुन दोन आरोपीना ताब्यात घेतले. आरोपीची नावे १. यव्हाण भास्कर कासार वय २४ वर्षे, रा. सणसवाडी, पुणे. २. विश्वजीत अर्जुन पवार वय २३ वर्षे, रा. मुकुदवाडी, संभाजीनगर, सदर आरोपी कडे एक धारधार कुकरी व चोरीची मोटार सायकल युनिकॉर्न क्र. एम.एच.११ सी.झेड.७५७८ ही मिळुन आली. सदर आरोपीकडे चौकशी करीता त्यानी दिघी आंळदी पोलीस ठाणे हद्दीत दि.२१/०२/२०२५ व दि.२२/०२/२०२५ रोजी गुन्हे केल्याचे कबुली दिली तसेच त्याच दिवशी पुणे ग्रामीण येथे ०१ पुणे शहर येथे ०३ गुन्हे केल्याची कबुली दिली.
सदर आरोपी कडुन तपासात आतापर्यंत खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
१ . दिघी पोलीस ठाणे गु.रजि.नं ७५/२०२५ भा. न्या. सं कलम ३०९ (६)
२. दिघी पोलीस ठाणे गु.रजि. नं ७७/२०२५ भा. न्या. सं कलम ३०९ (६)
३. आंळदी पोलीस ठाणे गु.रजि.नं ७०/२०२५ भा. न्या. सं कलम ३०९ (६)
४. विमाननगर पोलीस ठाणे गु. रजि.नं ९९/२०२५ भा.न्या.सं ३०९ (६)
५. विश्रांतवाडी पोलीस ठाणे गु. रजि.नं ३९/२०२५ भा.न्या. सं ३०९ (४)
६. शिक्रापरु पोलीस ठाणे गु.रजि.नं ११८/२०२५ भा. न्या. सं कलम ३०९ (६)
७. पाचोड पोलीस ठाणे गु. रजि.नं १२/२०२५ भा.न्या. सं ३०९ (६), ३(५)
८. सातारा संभाजीनगर पोलीस ठाणे गु. रजि. नं २३/२०२५ भा.न्या. सं ३०९ (६)
९. चिकलठाणा संभाजीनगर पोलीस ठाणे गु. रजि. नं २८/२०२५ भा.न्या. सं ३०९ (६)
१०. बिडकीन संभाजीनगर पोलीस ठाणे गु. रजि. नं.३७/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९ (४)
११. गोंदी जालना पोलीस ठाणे गु. रजि.नं ४१/२०२५ भा.न्या. सं ३०९ (४)
१२. आंबड पोलीस ठाणे २३/२०२५ भा.न्या. सं कलम ३०९ (४)
१३. खराडी पोलीस ठाणे १५/२०२५ भा.न्या. सं कलम ३०३(२)
सदर आरोपी पैकी आरोपी विश्वजीत अर्जुन पवार हा जालना जिल्हयातील खालील ०४ गुन्हयात पाहीजे आरोपी आहे. सदर आरोपीवर पुर्वीचे एकुण ०६ गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी पैकी आरोपी यव्हाण भास्कर कासार याचे वर पुर्वीचे ०२ गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी कडुन आतापर्यत चोरीची मोटार सायकल, तीन मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ५,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदर दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई करीता दिघी पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे. व सदर गुन्हयातील पाहीजे आरोपी यांचे बाबत अधिक तपास करीत आहोत.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो. पिंपरी चिंचवड, मा. पोलीस सह आयुक्त सो डॉ. शशिकांत महावरकर, मा. श्री. वसंत परदेशी साो, अपर पोलीस आयुक्त, मा. संदीप डोईफोडे पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे), मा. डॉ. विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे १), मा. श्री बाळासाहेब कोपनर, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे २), यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ, गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जिंतेद्र कदम, खंडणी विरोधी पथकांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री देंवेद्र चव्हाण, पोलीस उप निरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडील पोलीस हवा १२३६ मोरे, पोहवा १७४८ गडदे, पोना १७२२ कोकणे, पोशि २८६५ कदम, पोशि ३०३४ कदम, पोशि २१८४ आत्तार, खंडणी विरोधी पथकाकडील सपोफौ कानगुडे, पोहवा १५७२ जाधव, पोहवा ८०१ पोटे, पोहवा ८८१ गोडांबे, गुन्हे शाखा युनिट-०३ कडील पोहवा ८९३ सोनवणे, पोहवा १८६७ साबळे, पोशि २३५० राळे, तांत्रिक विशलेषण विभागचे पोहवा ३०६८ ननावरे, यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

