एमआयडीसी पोलीस ठाणे मुंबई यांचेकडील गुन्हयातील पाहिजे आरोपीतास केले जेरबंद गुन्हे शाखा, युनिट ६ ची कामगिरी


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दिनांक २३/१०/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील अधिकारी व अंमलदार गुन्हे प्रतिबंधक गस्त तसेच पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेत असताना एमआयडीसी पोलीस स्टेशन, मुंबई गु.र.नं. ६९७/२०२४ कलम ३१६ (४), ३१८ (४) भा.न्या.सं. मधील पाहिजे आरोपी नामे राज रविंद्र वाल्हे, वय २७ वर्षे, व्यवसाय ऑफीस बॉय, रा. एकता चाळ, जेबीनगर मेट्रोस्टेशनजवळ, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई हा समर्थ पोलीस स्टेशनचे हद्दीत लक्ष्मी रोड, पुणे येथील परीसरात असल्याची गोपनीय माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना मिळाली. सदर आरोपीचा शोध घेणेकामी गुन्हे शाखा युनिट ६ कडील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पथक यांना मिळालेल्या माहितीचे ठिकाणी रवाना केले असता त्यांनी नमुद पाहिजे आरोपीचा शोध घेवुन त्यास पराग लॉज, चाचा हलवाई चौक, नाना चवडी, नाना पेठ, पुणे येथुन ताब्यात घेतले.

सदरबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनकडे संपर्क करून सदर आरोपीस पोलीस उप- निरीक्षक काशिद, एमआयडीसी पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे. नमुद आरोपीकडुन गुन्हयातील
४,५०,०००/- रू. रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पो. हवा. बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, पो.ना. नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पो.अं. ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, समीर पिलाने, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे तसचे गुन्हे शाखा युनिट १ कडील पो. हवा. विठ्ठल साळुंके, मपोना मयुरी जाधव, पो.अं. निलेश जाधव, निलेश साबळे यांनी
केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!