गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची दमदार कामगीरी ! कोंढव्यातुन 202 ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थासह* *एक जण ताब्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक १ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा.पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा.पोलीस सह-आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त,गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा.पो उप आयुक्त, गुन्हे श्री निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे 01 पुणे शहर श्री. गणेश इंगळे यांनी पुणे शहरातील अंमली पदार्थ तस्करी करणारे गुन्हेगार यांची माहिती काढुन कडक कारवाई करण्याच्या सुचना व आदेश दिले आहेत.
वरिष्ठांनी दिलेले आदेश व सुचना नुसार मा. सहा. पो. आयुक्त,गुन्हे 1 श्री. गणेश इंगळे यांचे मागदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक 01 कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम व स्टाफ ने दिनांक 06/09/2024 रोजी कोंढवा पो स्टे चे हद्दीत स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना समीर शरीफ शेख रा. सय्यद काझी हाईटस कोंढवा, भाग्योदयनगर लेन नं. 30,कोंढवा पुणे. हा त्याचे राहते घरातुन एम.डी.(मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी त्याबाबत वरिष्ठांना कळविले असता, वरिष्ठांनी त्याबाबत कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पोलीस निरीक्षक उल्हास कदम व स्टाफ यांनी सय्यद काझी हाईटस भाग्योदयनगर,गल्ली नं. 30,कोंढवा पुणे येथे सापळा रचुन समीर शरीफ शेख वय 22 वर्षे रा. फलॅटनं 604, 6 वा मजला सय्यद काझी हाईटस, भाग्योदय नगर गल्ली नं . 30,मक्का मश्जिद जवळ कोंढवा पुणे.यास ताब्यात घेवुन त्यांची घर झडती घेतली असता त्यांचे ताब्यात एकुण किं. रु. 42,26,500/- चा ऐवज त्यामध्ये किं.रु. 40,40,000/- चा 202 ग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ, किं.रु.25,000/- चा एक स्टिलचा गावठी कट्टा, 80,000/- रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल, असा असलेला ऐवज व एम.डी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला असल्याने नमूद आरोपी यांचे विरूध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालु आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा.पोलीस सह-आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा.पो उप आयुक्त, गुन्हे श्री निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे 01 पुणे शहर श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक,1 गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार संदीप शिर्के, प्रविण उत्तेकर, उत्तम संदेश काकडे, दयानंद तेलंगे पाटील, विपुल गायकवाड, योगेश मोहिते, रेहाना शेख व कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार यांनी केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

