बापूसाहेब पठारे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज केला दाखल; मोठा जनसमुदाय उपस्थित; 23 तारखेला तुतारी फुंकण्याचा निश्चय….


महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी आज सोमवार (दि.२८) जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पठारे यांनी पुर्ण मतदारसंघात रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केले.

यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान पठारे समर्थकांनी घोषणाबाजी करत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. यावेळी युवा नेते सुरेंद्र पठारे यांच्यासह हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. त्यामुळे राजकीय खेळी करत शरद पवार यांनी बापूसाहेब पठारे यांना तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. पठारे आपली ताकद पणाला लावून २३ तारखेला तुतारी फुंकण्याचा निश्चय केलेला आहे.

बापूसाहेब पठारे यांची या मतदारसंघात पकड आहे. त्यांचा सरपंच ते आमदार असा प्रवास राहिलेला आहे. मतदारसंघातील मुख्य प्रश्न त्यांना माहित आहेत. आयटी पार्क तसेच विकसीत परिसर असलेल्या या वडगाव शेरीत लोहगाव, खराडी, वाघोलीचा काही परिसर, येरवडा, विश्रांतवाडी चंदननगर असा परिसर आहे.

पठारे यांनी खराडीमधून ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच होत आपल्या राजकीय जीवनास सुरुवात केली. नंतर ते पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्य आणि नंतर पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. ते स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर २००९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार झाले.
“येथील जनता त्रस्त झालेली आहे. त्यामुळे जनतेने यंदा बापूसाहेब पठारे यांनाच आमदार करण्याचा निश्चय केलेला आहे. या मतदार संघातून कोणाचे आवाहन नाही”, असे म्हणत बापूसाहेब पठारे यांनी रणशिंग फुंकलं आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!