खुनाच्या गुन्हयातील आरोपीकडुन जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयातील गेल्या मालासह ०२ पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे हस्तगत
पंकेश जाधव संपादक 7020794626
विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं ०२३/२०२४ भारतीय दंड संहिता, कलम ३९२ अन्वये दाखल गुन्हयात शास्त्री रोड, पुणे येथुन फिर्यादी वृध्द महिला रस्त्याने जात असताना मोटार सायकल स्वाराने गळयातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावुन नेली होती. सदर गुन्हयाचा तपास करणे बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकाचे अधिकारी मनोज बरुरे व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते.
दाखल गुन्हयाचे तपासात विश्रामबाग तपास पथकातील पोलीस हवालदार सचिन कदम यांनी गोपणीय खबऱ्याचे मदतीने सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे रफिक सलीम खान, वय ३६ वर्षे राबि ०७, जिवलग हॉसींग सोसायटी, आयटीए स्किम निगडी, पुणे याने केल्याचे निष्पन्न केले. आरोपीकडुन गुन्हयातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हस्तगत करण्यास आरोपीच्या राहते पत्यावर गेले असता आरोपीच्या घरी २० ग्रॅम वजनाच्या चैन सह, ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे मिळुन आली. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन आरोपीविरुध्द खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री संदिपसिह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त, श्री साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीमती विजयमाला पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तसेच मनोज बरुरे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार सचिन कदम, मयुर भोसले, अशोक माने, गणेश काठे, सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे, जाकीर मणियार, कैलास डुकरे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, नितीन बाबर, संतोष शेरखाने, व सागर मोरे यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

