सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हाद्दीत अवैधरित्या नायलॉन मांज्याची विक्री करणा-या इसमावर पोलीसांनी छापा टाकुण ११ नायलॉन मांजा रिळ केले जप्त.
अमिता कदम पुणे शहर प्रतिनिधी
सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, दि.११/०१/२०२५ रोजी तपास पथकातील पोलीस स्टाफ सिंहगडरोड पोलीस स्टेशन हाद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना सिंहगडरोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत करत मानाजीनगर न-हे पुणे येथे १६.३० वा, सुमारास आलो असता, पोलीस अंमलदार सागर शेडगे, व पोलीस अंमलदार आण्णा केकान, यांना त्याचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सिध्दी क्लासिक बिल्डींगचे शेजारी व अमोल दांगट याचे चाळी समोर मोकळ्या जागेत वडगाव बु पुणे. येथे एक इसम चोरुन शासनाने प्रतिंबंधीत केलेल्या नायलॉन मांज्याची त्यांच्या ओळखीच्या लोकांना विक्री करत आहे.
अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता, त्यांनी सदरची बातमी मा. वरिष्ठांना कळविल्याने मा. वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी १७.२५ वा. जाता सदर ठिकाणी एक इसम उपस्थित होता. त्यास आमची व आमचे सोबतचे पोलीस स्टाफची पंचाची ओळख सांगुन आमचे पोलीस आयकार्ड दाखवुन सदर इसमास त्याचे नावपत्ता विचारता त्याने आपले नाव पत्ता योगेश शत्रुध्न शहा वय २० वर्षे रा, दांगट याचे रुममध्ये भाडयाने अमोल दांगट याच्या घरासमोर, नेवसे हॉस्पीटल जवळ, वडगाव बु पुणे, त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याचे जवळ एका खाकी रंगाचे बॉक्स मध्ये ६,५००/-रुपये किंमतीचे ११ नायलॉन मांज्याचे रिळ आढळुन आले ते जप्त करुन त्यांचे विरुध्द सिंहगड रोड पो स्टेशन गुन्हा रजि नं २४/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम २२३, १२५, तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम १९८६ चे कलम ५,१५ अन्वये दाखल करण्यात आला असुन पुढील अधिक तपास पोलीस हवालदार, संजय शिंदे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री अमितेश कुमार साो पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील सोो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. संभाजी कदम सोो, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३, पुणे शहर, श्री अजय परमार सोो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री. दिलीप दाईंगडे साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, श्री संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, आण्णा केकाण, उत्तम तारु, पंकज देशमुख, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास पांडोळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, विकास बांदल, यांचे पथकाने केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

