महिला दिनाचे औचित्य साधुन येरवडा मध्यवर्ती कारागृह व रोटरी क्लब ऑफ खडकी महिला बंद्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. अमिताभ गुप्ता (भा.पो.से.), अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा यांचे प्रेरणेने दि. ८.०३.२०२४ रोजी महिला दिनाचे औचित्य साधुन येरवडा मध्यवर्ती कारागृह व रोटरी क्लब ऑफ खडकी, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने येरवडा महिला कारागृहात मा. श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे प्रमुख उपस्थितीत महिला बंद्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.

येरवडा महिला कारागृहामध्ये सरासरी २७५ ते ३०० महिला बंदी बंदिस्त असतात. महिला दिनाचे निमित्ताने महिला बंद्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी मा. श्रीमती स्वाती साठे यांचे हस्ते महिला कारागृहात बसविण्यात आलेल्या वॉशिंग मशिनचे उद्घाटन करण्यात आले. तसेच रोटरी क्लब ऑफ खडकी, पुणे यांचमार्फत महिला बंदीच्या आरोग्याच्या दृष्टिने वॉटर प्युरीफायर देण्यात आले. त्यंाच उद्घाटन सुध्दा मा. महोदयांचे हस्ते करण्यात आले. दि. ११.११.२०२३ रोजी महिला कारागृहाच्या गोकुळात एका बाळकृष्णाचे आगमन झाले. आजच्या या शुभदिनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत बाळाचा नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला. आज महिला दिन व महाशिवरात्री, हा योग साधून या छोटया बाळाचे शिवा असे नामकरण करण्यात आले.

Advertisement

स्वागत गीताने मा. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदरच्या विविधरंगी कार्यक्रमात श्री गणेश वंदना, लावणी, कथ्थक, झुंवा, देवी गोंधळ, मंगळागौर, शिवतांडव, बंगला डान्स, नटरंग, भारुड, वाईपण भारी देवा व विविधतेतून एकतेचा संदेश देणारा फॅशन शो अशा विविध रंगी कार्यक्रमाचे यावेळी महिला बंद्याकडून उत्कृष्टपणे सादरीकरण करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शनपर भाषण करताना मा. श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांनी महिला बंदोच्या या कार्यक्रमाचे खूप कौतूक केले. तसेच सिध्ददोष महिला बंदींना यानिमित्ताने विशेष माफी जाहीर केली. यावेळी मा. श्री सुनील ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, मा. डॉ. भाईदास ढोले, श्रीमती पल्लवी कदम, श्री रविंद्र गायकवाड, उपअधीक्षक, श्री आनंद कांदे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, तसेच श्रीमती पुनम किशनचंदानी, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ खडकी, पुणे, श्रीमती उमा अग्रवाल, श्रीमती शिखा गुप्ता, श्रीमती रुपल पटेल, श्रीमती सोमा बेडेकर, श्रीमती शितल तेजवाणी, श्रीमती सुनिती गोयल श्रीमती मंजु प्रसाद उपस्थित होते.

श्रीमती रतन खिलारी, श्रीमती वैशाली मारकड, श्रीमती पौणिमा पालोदकर, महिला तुरुंगाधिकारी, श्रीमती रुणाक्षी गवळी, शिक्षिका, श्रीमती हिना सय्यद, सामाजिक कार्यकर्ता, सोनाली जाधव, वनिता वाघमारे, मनिषा गुडेकर, सीमा तुपे, सुनिता बनकर, रुखसाना शेख, स्नेहा कांबळे, माधुरी पुसदकर, तृप्ती धुमाळ, मुक्ता सूर्यवंशी, प्रतिभा पाटील, नजमा फुलमामडी, वर्षा मोकाटे, योगीनी शेलार, सोनाली सावंत, गीता बादणे, महिला शिपाई यांनी सदरच्या सदाबहार कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती रजनी मोटके, शिक्षिका यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती पल्लवी कदम, उपअधीक्षक यांनी केले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!