अट्रोसिटी गुन्ह्यांमधील आरोपीस अटक पूर्व जामीन मंजूर


महा पोलिस न्यूज ऑनलाईन नागरी :-दिनांक २२/०१/२०२४ रोजी श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम जगभर साजरा करत असताना , हडपसर गोसावीवस्ती या ठिकाणी फटाक्यांचा वर्षाव झाला व फिर्यादी यांच्या घरासमोर फटाके वाजविण्यात आले. फिर्यादी यांनी प्रकरण थांबवत असताना आरोपी यांनी नकार दिला व दोन गटात भांडणे झाली.

Advertisement

जातीवाचक शिवीगाळ झाली, त्याकारणास्तव दोन्ही गटांविरोधात हडपसर पोलीस स्टेशन येथे भा. दं. वि. 323,324,143,147,149,504,506 व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ – 3(1) आर , 3(1) एस , अंतर्गत गुन्हा नोंद झाला.

त्यातील शुभम पवार आरोपीच्या वतीने ॲड. शैलेश बेरे-पाटील यांनी युक्तिवाद केला व पुरावे कोर्टासमोर सादर केले असता, मा. जिल्हा व सत्र न्यायालय पुणे यांनी युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी शुभम पवार याचा अटक पूर्व जामीन मंजूर केला.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!