पोलीसांच्या कायदेशिर रखवालीतून पळून गेलेल्या आरोपीतास अटक केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील गुरनं ७९/२०२४, भादंवि कलम ५००,५०४, ५०६,५०९ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ या गुन्हयातील फिर्यादी यांनी तक्रार दिली की, इन्स्टाग्राम आयडी munna polekar302 यावरून त्यांना उद्देशून शिव्या घालून, मारण्याची धमकी देवून तसेच रिल्स पोस्ट करून त्यांचे मनास लज्जा उत्पन्न केली व समाजामध्ये त्याची बदनामी केली म्हणून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयामध्ये इन्स्टाग्राम कंपनीकडून प्राप्त माहितीच्या तांत्रिक विश्लेषणावरून दिनांक ०९/०२/२०२४ रोजी आरोपी नामे मार्शल लुईस लीलाकर, वय २४ वर्षे, रा. भाऊ पाटील चाळ, जुने नाव- धोंडीबा दातीर पाटील चाळ, रुम नंबर १, मारुती मंदीराच्या पाठीमागे, आकुर्डी मेन रोड, आकुर्डी, पुणे यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली होती. आरोपीताचा गुन्हयातील सक्रीय सहभाग निष्पन्न झाल्याने (इन्स्टाग्राम आयडी ज्या मोबाईल मधून तयार केला तो गोबाईल फोन त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. तसेच त्याने नमुद आयडी ज्या आयपी लॉगवरून लॉग ईन केला होता त्या हॉटेलचे फुटेजमध्ये देखील सदर आरोपी मिळून आला आहे.) तसेच आरोपीताकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करणेकरीता पोलीस कोठडी घेण्यासाठी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीताची दि. १३/०२/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला होता. नमुद आरोपी पोलीस कोठडीत असताना दिनांक ११/०२/२०२४ रोजी वैदयकीय तपासणी करीता ससून हॉस्पीटल येथे नेले असता तो पोलीस रखवालीतून पळून गेला.

Advertisement

आरोपी पळून गेले बाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु.र.नं. ४४/२०२४ मा.दं.वि. कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीताचा शोध घेणेकामी सायबर पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची विविध पथके तयार केली. काही पथके आरोपीताचे मागावर, रेल्वे सीसीटीव्ही फुटेज पाहण्याकरीता काही टिम, तसेच आरोपीताचे नातेवाईकांकडे व आरोपीताची मैत्रिणीकडे एक टिम तसेच आरोपीताचा माग काढण्या करीता लोणावळा, कर्जत, कल्याण येथे देखील काही टीम रवाना केल्या होत्या. सदर शोध कार्यास दिनांक १७/०२/२०२४ रोजी यश मिळाले असून आरोपीताचे मावशीच्या घरी येरवडा, पुणे येथे पाळत ठेवून असणारे पोलीस अंमलदार नागटीळक व महिला पोलीस अंमलदार सोनवणे यांस पहाटे सदर आरोपी आल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे व नमुद आरोपीतास पुढील कार्यवाहीसाठी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

  1. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री प्रविण पवार, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, श्री. विक्रांत देशमुख, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे श्री. आर.एन. राजे, व मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा १. श्री. सुनिल तांबे, यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमती मिनल सुपे-पाटील, पोलीस निरीक्षक विजय खोमणे तसेच गुन्हे शाखेकडील शोध पथकातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सदर शोध मोहिम यशस्वी रित्या पार पाडली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!