मोक्का रिलीज गुन्हयातील गुन्हेगाराकडून जबरी चोरीचे ०२ गुन्हे उघड करुन ९३,०००/- रु.किं.चा मुद्देमाल केला जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०७/०२/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे बंडगार्डन पोलीस स्टेशनचे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस अंमलदार ओमकार कुंभार व हनमंत कांबळे यांना मिळालेल्या गोपनिय बातमीच्या अनुषंगाने मोक्का जेल रिलीज गुन्हेगार नामे मोहरम अली शफी शेख वय ३२ वर्ष रा. संजय गांधी मार्ग झोपडपटटी मालधक्का चौक बंडगार्डन पुणे यास ताब्यात घेवुन केलेल्या चौकशीमध्ये त्याचेकडून जबरी चोरी केलेले एकुण ९३,०००/-रु.चे ०४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
सदर आरोपीकडून वरील प्रमाणे मुददेमाल जप्त करुन १) लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २३/२०२५ बीएनएस कलम ३०९ (४), २) बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४९/२०२५ भा.द.वि. कलम ३९२ अन्वये दोन गुन्हे उघड करण्यात आले असून आरोपीस लष्कर पोलीस स्टेशन कडील गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे अधिक तपास चालू आहे.

सदर आरोपी हा रेकार्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर बंडगार्डन गुन्हा रजि नंबर १४३/२०२१ भा.द.वि. ३९५,३९७,३२३,५०४, तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अॅक्ट प्रमाणे तसेच इतर ०६ चोरी बाबत गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ पुणे श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, पोलीस उप-निरीक्षक नितीन कांबळे व पोलीस अंमलदार शंकर नेवसे, ओमकार कुंभार, हनुमंत काबंळे, अमोल सरडे, उज्वल मोकाशी, संजय जाधव, शंकर कुंभार, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेद्र चव्हाण, नागेश राख यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!