फिरण्यासाठी गाडया चोरणाऱ्या आरोपीकडुन ११ दुचाकी गाड्या जप्त” भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी


पंकेश जाधव संपादक 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे. मा. वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबरं ६२६/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा शोध घेतं असतानासहाय्यक पोलीस फौजदार नामदेव रेणुसे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नमुद गुन्हयातील चोरीस गेली दुचाकी गाडी एक इसम नमुद गुन्हयातील चोरीस गेले दुचाकी गाडीसह फिरत आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन्चे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार नामदेव रेणुसे, हनमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, सतिंश मोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे यांनी सदर आरोपीतांचा शोध घेत असताना सातारा रोडवरील भुयारी मार्गालगतचं लोखंडी पुलाजवळ इसम नामे श्रावण माधव शिंदे, वय २६ वर्षे, रा. साईराम हाईटस, रेणुका पार्क, उबाळेनगर, वाघोली, पुणे हा गुन्हयातील चोरीस गेले हिरो होंडा कंपनीची पेंशन दुचाकी मीटार सायकल, तिचा नंबर MH12CW5881 – हिच्यासह मिळुन आल्याने त्याचेकडे अधिक तपास करता त्यांनी गाडी चोरी केल्याची कबुली दिल्याने ती गाडी पंचनाम्याने जप्त करुन त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे. अटके दरम्यान आरोपीकडे केले तपासामध्ये आरोपीकडुन ६ लाख रुपये किंमतीच्या एकुण ११ दुचाकी गांडया जप्त करण्यात. आंल्या असुन सदर गाडयांबाबत कोठे गुन्हे दाखल आहेत यांबाबत तपास चालु आहे.

Advertisement

 

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. नंदीनी वग्याणी साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस, निरीक्षक श्रीं डी.एस.पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी,सहाय्यक पोलीस फौजदार नामदेव रेणुसे, हनुमंत माथीक, चेतन गोरे ,निलेश जमदाडे, सतिश मोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, शैलेश साठे, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, धनाजी थोत्रे, सचिन सरपाले, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!