श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे समुद्रपूरचे ठाणेदार संतोष शेगावकर यांचा सत्कार……..


अरुण हरडे नागपूर ब्यूरो चिफ 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन वर्धा :-दिनांक 28 जुलै रोजी लाहोरी येथून समुद्रपूरकडे निघालेला आयशर ट्रक क्रमांक . एम एच 40 एन 58 34 वाघाडी नाल्याच्या पुरात तीन युवकांसहित वाहत गेला. याची माहिती समुद्रपूरचे ठाणेदार संतोष शेगावकर यांना देण्यात आली. ठाणेदार संतोष शेगावकर हे आपल्या चम्मू सहित घटनास्थळावर दाखल झाले व भर पावसात नाल्याचे पाण्याची वाढ होत दिसली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता ठाणेदार संतोष शेगावकर, उपनिरीक्षक टेंभुर्णे, उपनिरीक्षक देरकर या तिघांनीही आपली जिवा ची पर्वा न करता वाघाडी नाल्याच्या पुरामध्ये उड्या घेत तिघांचेही सुखरूप प्राण वाचवले त्याबद्दल त्यांच्या धाडसाचे कौतुक करीत श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघ चे संस्थापक व अध्यक्ष महेश ठाकूर नागपूर, प्रदेश अध्यक्ष ईश्त्याक शेख व विदर्भ अध्यक्ष मनोज पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य व सकाळ व नवराष्ट्र चे पत्रकार प्रभाकर कोळसे यांनी समुद्रपूर पोलीस स्टेशन येथे जाऊन ठाणेदार संतोष शेगावकर व उपनिरीक्षक टेंभुर्णे, उपनिरीक्षक देरकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे दिनांक एक ऑगस्ट 2024 रोजी सत्कार करण्यात आला.

Advertisement

त्यावेळी नवराष्ट्र नवभारत चे ता. प्र. कृष्णा धुळे, पत्रकार चंदू घुगसे, नारायणपूर, तौसीफ अली पत्रकार हिंगणघाट व समुद्रपूर पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!