गून्हे शाखा यूनिट ३ ची दमदार कामगिरी ! निवडणुकीच्या काळात १ पिस्टल व ०१ राऊंडसह आरोपी ताब्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा, युनिट ३, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०५/११/२०२४ रोजी गुन्हे शाखा, युनिट ३, पुणे कडील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळाले बातमीवरून आरोपी नामे सौरभ अरुण मानकर वय. २३ वर्षे रा. मु. पो. सांगरुण ता. हवेली जि. पुणे यास दि. ०५/११/२०२४ रोजी स्मशानभुमी, सांगरुण गाव, ता. हवेली, जि.पुणे येथून ताब्यात घेवून त्याचेकडून एक पिस्टल व एक काडतुस काढून दिल्याने त्याचेविरूध्द उत्तमनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर १३५/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयाचा पुढिल तपास मुकेश कुरेवाड, उत्तमनगर पोलीस ठाणे, पुणे शहर हे करीत आहेत.आरोपी सौरभ अरुण मानकर वय २३ वर्षे रा.मु.पो. सांगरुण ता. हवेली जि.पुणे याचेकडे केले तपासात त्याने सदरचे पिस्टल हे त्याचा साथीदार याचेकडून घेतले असल्याचे सांगितले असून त्याचा शोध सुरू आहे.
सदरची कामगिरी ही, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर श्री. गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रंगराव पवार, सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार शरद वाकसे, विनोद भंडलकर, गणेश सुतार, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, हरिश गायकवाड, प्रतिक मोरे, राकेश टेकावडे, इसाक पठाण व सुजित पवार यांनी केली आहे.
Cheif Editor : Pankesh jadhav