बिबवेवाडी येथून बेपत्ता तिन अल्पवयीन मुलीचा २४ तासाच्या आत बिबवेवाडी पोलीसांनी घेतला शोध
पंकेश जाधव संपादक 7020794626
बिबवेवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :– सदरबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ०२/०९/२०२४ रोजी दुपारी ०१.३० वा.चे सुमारास शिवतेजनगर बिबवेवाडी पुणे येथून तिन अल्पवयीन मुलगी अनुक्रमे वय १२ वर्षे, १५ वर्षे, १५ वर्षे वयाच्या हया बेपत्ता झालेबाबत बिबवेवाडी पोलीस ठाणे खबर प्राप्त झालेने त्यावरून बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २०८/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम १३७ (२) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयातील अल्पवयीन तिन मुली बेपत्ता झालेबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांना तात्काळ माहिती देवून मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाणे कडील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, तपास अधिकारी सहा पोलीस निरीक्षक विद्या सावंत, तपासपथक प्रभारी अशोक येवले व तपासपथकातील सर्व अमंलदार, पोलीस स्टेशनकडील इतर स्टाफ, टिम तयार करून अल्पवयीन मुलीचा शोध होणेकामी मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा यांचे सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली बेपत्ता मुलींचा त्यांचे मित्र, मैत्रिण यांचेकडे चौकशी करून सदर मुलींचा तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने शोध घेत असताना त्या अंबविली कल्याण जि.ठाणे येथे असल्याची माहिती प्राप्त झालेने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी सदर माहिती मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, यांना दिलेनंतर खडकपाडा पोलीस ठाणे कल्याण येथे संपर्क करून सदर नमुद मुलींचे वर्णन सांगून त्यांना अंबिवली येथून ताब्यात घेवून बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे सुखरूपणे आणण्यात आलेले आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक, विद्या सावंत हया करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा.अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, सपोनि विद्या सावंत, तपासपथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस अमंलदार विशाल जाधव, प्रतिक करंजे, महिला पोलीस अमंलदार वर्षा ठोंबरे यांनी केली आहे.
Cheif Editor : Pankesh jadhav