नाशिक शहरामध्ये अल्पवयीन मुलाचा खून करून अपघाताचा बनाव केलेला खुनाचा गुन्हा बिबवेवाडी पोलीसांनी सखोल तपास करून उघड केला


पंकेश जाधव संपादक 7020794626

बिबवेवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदरबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ०२/०९/२०२४ रोजी बिबवेवाडी पोलीस ठाणे कमला नेहरू हॉस्पिटल कसबापेठ पुणे यांनी खबर दिली की, महिला नामे पल्लवी विरभद्र काळे, वय २४ वर्षे, रा. राजीव गांधी नगर अप्पर बिबवेवाडी पुणे यांनी कळविले की, पेशंट नामे वेदांश विरभद्र काळे, वय-०४ वर्षे, रा. सदर हे सकाळी ०६/०० वा. राहते घरात कॉटवरून पडला. आई घरी नव्हती. आई सकाळी ०८/०० वा. सुमारास कामावरून घरी आल्यावर पाहिले असता पेशंट बेशुध्द होता व डोक्याला मार लागला होता. १५ दिवसापुर्वी लोनावळा पुणे येथे टेरेसवरून पडल्यामुळे उपचार केले होते व हाताला प्लॅस्टर आहे. आज रोजी पुढील उपचारकामी कमला नेहरू हॉस्पिटल कसबा पेठ पुणे येथे दि. ०२/०९/२०२४ रोजी सकाळी ०९/४३ वा. आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना ०९/५३ वा. उपचारापुर्वी मयत घोषीत केले. त्याचा एम.एल.सी. नं २१/२०२४ असा आहे, वगैर मजकुरची खबर प्राप्त झालेने सदर मुलाचे पोस्टमार्टम झालेंनतर त्यास “Multiple Injuries” ने मरण आल्याचे डॉक्टांनी सांगितलेने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री शशांक जाधव व पोलीस अमंलदार विजय लाड, अंकुश केंगले, नितीन धोत्रे व महिला पोलीस अमंलदार आदिती बहिरट यांनी सदर मुलाचे आईकडे चौकशी करीत असताना ती उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच सदर महिला अप्पर बिबवेवाडी पुणे येथे तिन महिन्यापासून राहत नसल्याची माहिती प्राप्त झालेने सदर बाबत संशय निर्माण झालेने तिचे नातेवाईक व तिचेकडे अधिक चौकशी करता सदर महिला पल्लवी काळे हीचे काही महिन्यापासून आरोपी नामे महेश कुंभार रा. पंचवटी नाशिक याचेशी प्रेमसंबध होते. सुमारे तिन महिन्यापासून ती अप्पर बिबवेवाडी पुणे येथून तिचे मुलांसह महेश कुंभार याचेबरोबर कृष्णानगर पंचवटी नाशिक येथे राहणेस गेली. सदर ठिकाणी दिनांक ०१/०९/२०२४ रोजी रात्रौ ११.०० वा. सदर महिलेचा मुलगा वेदांश वय ०४ वर्षे हा जेवल्यानंतर उलटी केल्यामुळे त्याचा राग येवून आरोपी महेश कुंभार यांने मुलगा वेदांश यास हाताने व झाडुने मारहाण केली त्यामुळे तो बेशुध्द पडलेने त्यास प्रथम नाशिक येथील सिव्हील हॉस्पीटल घेवून गेले व त्यानंतर तेथून त्यास सदर महिलेने व आरोपी महेश कुंभार यांनी कमला नेहरू हॉस्पीटल पुणे येथे आणले असता हॉस्पीटल यांनी दिलेल्या खबरी वरून पुढील तपास केला असता नमुद मुलाचा महेश कुंभार याने केलेल्या मारहाणी मुळे मृत्यू झालेचे निष्पन्न झालेने पोलीस उप निरीक्षक श्री शशांक जाधव यांनी फिर्याद देवून बिबवेवाडी पोलीस ठाणे झिरो नंबर ने खुनाचा गुन्हा नोंद करून तो पंचवटी पोलीस ठाणे नाशिक पोलीस यांचेकडे वर्ग केला आहे. आरोपी महेश कुंभार यांचा तांत्रिक विश्लेषण व पोलीस उप निरीक्षक अशोक येवले यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळालेवरून सदर आरोपी हा नाशिक येथे असल्याचे माहिती पंचवटी पोलीसांना दिल्याने सदर आरोपीस पंचवटी पोलीसांनी ताब्यात घेतलेला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, तपास अधिकारी पोलीस पोलीस उप निरीक्षक श्री शशांक जाधव, पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस उप निरीक्षक विवेक सिसाळ, पोलीस अमंलदार विजय लाड, अंकुश केंगले, नितीन धोत्रे, विशाल जाधव, संजय आग्रे, अजय कामठे व महिला पोलीस अमंलदार आदिती बहिरट यांनी यांनी केली आहे.


Maha police NEWS

Cheif Editor : Pankesh jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!