मोक्यातील व इतर तीन गुन्हयातील पाहिजे आरोपी तसेच फायरींग मधील फरार असलेल्या वेगवेगळ्या गुन्हयातील दोन आरोपींना सिंहगडरोड पोलीसांनी ठोकल्या बेड्या


पंकेश जाधव संपादक 7020794626

सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– सदर बाबत माहिती अशी की, सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजि नं ४००/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १०९ (१), १११,६१ (२) सह भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) (२७) सह महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१) (३) १३५,१४२, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३ (४) यामधील पाहीजे आरोपी नामे रवि मधुकर जाधव रा. संजीवन अपार्टमेंट जाधवनगर वडगाव बु पुणे हा गेली दोन महिन्यापासुन फरार असुन त्याचा शोध मा. संभाजी कदम साो, पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ ३ पुणे शहर व मा. अजय परमार साो, सहायक पोलीस आयुक्त सो, सिंहगडरोड विभाग पुणे याचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे करीत होते.

Advertisement

दि.०६/११/२०२४ रोजी तपास पथकातील पोलीस अधिकारी सचिन निकम, सहायक पोलीस निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस स्टाफ असे पाहिजे आरोपी रवि मधुकर जाधव याचा शोध घेत असताना, पोलीस उपनिरीक्षक, संतोष भांडवलकर यांना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन महिन्यापासुन पोलीसांना गुंगारा देणारा पाहीजे आरोपी रवि जाधव हा पठारवाडी, शिंदेवाडी येथील चर्तुःमुख महादेव मंदीर जवळील डोंगरावर लपुन बसला आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने लागलीच सदरची बातमी त्यांनी मा. वरिष्ठांना कळविली असता, मा. वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करुन योग्यती कार्यवाही करणे बाबत मुखजल आदेश दिल्याने, सपोनि सचिन निकम, व पोउपनि संतोष भांडवलकर, व पोलीस स्टाफ असे, बातमीच्या ठिकाणी रवाना होवुन पाहीजे आरोपी रवि जाधव याचा पठारवाडी जवळील चर्तुःमुख महादेव मंदीर परिसरात डोंगराळ भागात शोध घेतला असता, तो मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेत असताना त्याने अटकेस मज्जाव केला म्हणुन त्यास वाजवी बळाचा वापर करुन त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता रवि मधुकर जाधव वय २६ वर्षे रा. संजीवन हेरीटेज, जाधवनगर वडगाव बु पुणे. असे असल्याचे सांगितले, तो पुढील गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

त्यास पुढील योग्य त्या कारवाई कामी ताब्यात घेतले असुन, त्याच्याकडे दाखल गुन्ह्याबाबत अधिक तपास करता त्यांनी सदरचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपी नामे रवि मधुकर जाधव वय – २६ वर्षे रा. संजीवन अपार्टमेंट जाधवनगर वडगाव बु पुणे यास मा. श्री. अजय परमार, साो, सहायक पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर कडील तपासाधीन मोक्का कायदयाअंतर्गत गुन्हयात अटक करण्यात आली असुन, पुढील तपास मा.श्री. अजय परमार साो, सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर मा. रंजणकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा.प्रविण कुमार पाटील साो, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर मा. संभाजी कदम साो, पोलीस उपआयुक्त परीमंडळ ३, श्री अजय परमार सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री. राघवेंद्रसिंह क्षीरसागर साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. उत्तम भजनावळे साो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सचिन निकम, सहा. पोलीस निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, उत्तम तारु, पंकज देशमुख, अमोल पाटील, देवा चव्हाण, सागर शेडगे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, विकास पांडुळे, विकास बांदल, यांनी केली आहे.


Maha police NEWS

Cheif Editor : Pankesh jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!