येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अडी-अडचणी संदर्भात मा. श्री. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचा अध्यक्षेते खाली त्रिमासिक बैटक पार…
पंकेश जाधव संपदाक 7020794626
येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे-०६.
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अडी-अडचणी संदर्भात मा. श्री. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांचे अध्यक्षतेखाली अभिविक्षक मंडळाची त्रैमासिक बैठक दिनांक ०२/०८/२०२४ रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे पार पडली.
सदर बैठकीमध्ये मा. महोदयांनी कारागृहातील सोई-सुविधा, कारागृह सुरक्षा व्यवस्था, नवीन बांधकामे. कारागृहाच्या जागेवरील अतिक्रमण, बंदी आरोग्य व कारागृहाच्या दैनंदीन अडी-अडचणी याबाबत माहिती जाणून घेतली व संबंधीत विभाग प्रमुखांना अडी-अडचणी सोडविणेसंदर्भात निर्देशित केले. तसेच जिल्हा नियोजन समिती यांचे वार्षिक निधीतुन कारागृहास प्राप्त टँकर व बोलेरो या वाहनाचे उद्घाटन केले.
सदर भेटीदरम्यान पोलीस आयुक्त कार्यालय, जिल्हा पोलीस अधिकक्षक कार्यालय, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस मुख्यालय, ससून सर्वोपचार रुग्णालय, महिला व बाल कल्याण विभाग, येरवडा मुद्रणालय व इतर संबंधीत शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

