येरवडा पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगीरी ! बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणा-या सराईतास केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलीस अंमलदार तुषार खराडे, सुशांत भोसले, सुरज ओंबासे हे दि. २६/०७/२०२४ रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संगमवाडी येथील दत्त मंदिराचे मागे दोन संशयीत इसम थांबलेले असून त्यांचेकडे देशी बनावटीचे पिस्टल आहे. अशी माहिती मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील पाटील, व स्टाफ यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अग्नीशस्त्र बाळगणा-यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे १ पिस्टल व १ राऊंड मिळून आले. त्यांस त्याचा नाव पत्ता विचारता रोहन रमेश पवार वय १८ वर्षे रा पगडे वस्ती च-होली पुणे व एक विधीसंघर्षित बालक असे असल्याचे सांगितले.
सदरबाबत दि. २७/०७/२०२४ रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गु र नं ४८०/२०२४ भारतीय हत्यार कायदा ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून एकूण ३०,०००/- रु किंमतीचे एकूण १ पिस्टल व १ राऊंड हस्तगत करण्यात आले आहेत. सदर गुन्हयामध्ये अभिजीत उमेश अवचरे वय १८ वर्षे रा पिसोळी पुणे व शाम संतोष गायकवाड वय १९ वर्षे रा झेंडेवाडी ता. पुरंधर पुणे असे एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास तपास पथकाचे पोउपनि स्वप्निल पाटिल करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, श्री विजयकुमार मगर, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन श्री. रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. छगन कापसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती पल्लवी मेहेर, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि स्वप्निल पाटील, पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

