डिजिटल अरेसट केल्याची भीती घालून ५३लाखाची केली फसवणूक. सायबर पोलिसांनी ०२जणांना ठोकल्या बेड्या.
पुणे ब्युरो चीफ-डॅनियल ॲनथोनी 8796273945
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी:९तुमच्यावर मनी लॉन्ड्रीगची केस झाली असून एक टीम तुम्हाला अटक करण्यासाठी येत आहे ,अशी भीती घालून फिर्यादी यांना एकूण ५२लाख ५९हजार रुपयाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना पिंपरी चिंचवड सायबर पोलीस ठाण्याकडून अटक करण्यात आली आहे.
१)आकाश बाबासाहेब पठारे (वय २८ वर्षे )व २)अविनाश श्रीकांत तुंगार (दोघे रा.बोल्हेगाव अहिल्यानगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना एक अनोळखी मोबाईल नंबर वरून फोन आला होता .हा फोन मुंबई क्राईम ब्रँच संताजी घोरपडे ,फायनान्स विभागाचे मुख्य जॉर्ज मॅथू असल्याचे सांगण्यात आले होते .तसेच फिर्यादी यांना व्हाट्सअप व्हिडिओ कॉल करून त्यांच्या नावे असलेली बँक एसबीआय व एचडीएफसी बँक खात्यात जमा असलेली रक्कम मनी लॉन्ड्रीग असल्याचे सांगून केस झाली आहे असे सांगण्यात आले .त्यामुळे तुम्हाला एक टीम अटक करण्यासाठी निघाली आहे .सदर रक्कम आरबीआय फायनान्स करून पडताळणी करण्याच्या बहाण्याने मनी लॉन्ड्रीग व त्यांच्या मध्ये अटक करण्याची भीती घातली तसेच त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात एकूण ५२लाख ५९ हजार रुपये भरल्यास भाग पाडले.आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच फिर्यादी यांनी सायबर पोलीस कडे धाव घेतली तांत्रिक तपास दरम्यान ॲक्सिस बँकेतून ५लाख ३९हजार ८४०रुपये ट्रान्सफर झाले असल्याचे माहिती प्राप्ती झाली हा खातेदार अहिल्यानगर येथील माहिती सायबर सेलला मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांना दोन पथक तयार केले आणि अहिल्यानगर मधून आकाश पठारे यांना ताब्यात घेतले त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने त्याचे साथीदार १)अविनाश तुंगार ,शुभम उर्फ विकी देठे व कृष्णा उर्फ जितू भगत यांच्यासह केल्याची कबुली दिली.एखाद्या व्यक्तीला अनोळखी नंबर वरून पोलीस ,न्यायाधीश ,सीबीआय ,ऑडिटर ,सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ,फायनांस डिपार्टमेंट हेड ,सेक्रेटरी ऑफ मिनिस्ट्री अशा वेगवेगळ्या नावाने संपर्क केला जातो .तुमच्यावर मनी लॉन्ड्रीगचा गुन्हा दाखल झाला असलेले सांगून भीती घातली जाते ,व्हिडिओ कॉल द्वारे देखील संपर्क करून विश्वास संपादन केला जातो .नंतर संबंधित व्यक्तीला त्याच्या बँक खात्यावरील रक्कम दिलेल्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगितले जाते .अशा प्रकारचे फोन नागरिकास आल्यास त्याने त्वरित सायबर पोलीस ठाणे येथे संपर्क साधा,अथवा cybercrime.gov.in वेबसाईटवर किंवा १९३० या टोल फ्री नंबर वर संपर्क साधावा असे आव्हान नागरिकांना करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सह आयुक्त डॉ.शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड ,पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे , सहायक पोलीस आयुक्त डॉ.विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींकिरण नाळे ,प्रवीण स्वामी ,उपनिरीक्षक प्रकाश कातकडे ,पोलिस अंमलदार अतुल लोखंडे ,हेमंत खरात ,दीपक भोसले ,नितेश बिचेवार,स्वप्निल कणसे ,महेश मोटकर ,ज्योती साळे, वैशाली बर्गे यांच्या पथकाने ही कारवाई

मुख्य संपादक :- पंकेश जाधव