खुनाचा प्रयत्न करुन पसार झालेल्या आरोपीस स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :– राजगड पोलीस ठाणे पुणे ग्रामीण गुन्हा रजि. नं. २२४/२०२४ भा.द.वि. कलम ३०७, ३५३. मधील फिर्यादी यांनी आरोपी नामे रोहन साळवे रा. कल्याण ता. हवेली जि.पुणे यांचेविरुद्ध तक्रार दिल्याने वर नमुद गुन्हा नोंद करण्यात आला होता.
आज रोजी सदर गुन्हयातील आरोपी हा स्वारगेट येथील गुलटेकडी परिसरामध्ये आला असल्याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अंमलदार अनिस शेख व रमेश चव्हाण यांना मिळाल्याने त्यांनी सदर बातमीबाबत तपास पथकाचे सपोनि प्रशांत संदे यांना सांगितली असता त्यांनी सदर बातमीबाबत मा. दिलीप फुलपगारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन यांना माहिती दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.
त्यावरुन सपोनि प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले व पो/अं अनिस शेख, रमेश चव्हाण, सोमनाथ कांबळे असे मिळुन मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता सदर आरोपी दिसुन आल्याने त्याचा शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेवुन त्यास त्याचा नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रोहन गौतम साळवे वय २४ वर्षे रा. कल्याण ता. हवेली जि.पुणे असे असल्याचे सांगितले त्याचेकडे वरील गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील तपासकामी राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांचेकडील पोलीस अंमलदार यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही मा.श्री. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.श्री. प्रविण पवार साो, पोलीस सहआयुक्त पुणे शहर, मा.श्री. प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. स्मार्तना पाटील सो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, मा.श्रीमती नंदिनी वग्यानी सो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती गीता बागवडे साो यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक येवले, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले व पोलीस अंमलदार पो/अं ९८२० अनिस शेख, पो/अं १००६८ रमेश चव्हाण, पो/अं ८२३९ सोमनाथ कांबळे, पो/अं १००१६ शिवा गायकवाड, पो/अं १००६२ फिरोज शेख, पो/अं ९९६३ दिपक खंदाड, पो/अं ३५४१ प्रविण गोडस, पो/अं १०१४७ संदीप घुले, पो/अं १००५७ सुजय पवार यांनी एकत्र मिळुन केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

