उरुळी कांचन येथे किरकोळ कारणावरून धारदार चाकूहल्ला; जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
दत्ता म्हस्के पुणे प्रतिनिधी
उरुळी कांचन पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- उरुळी कांचन, ता. हवेली: उरुळी कांचन येथील तुपेवस्ती परिसरात प्रिन्स जनरल स्टोअर्ससमोर एका किरकोळ वादातून एका व्यक्तीवर धारदार चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना काल, दिनांक २५/११/२०२५ रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या भावाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
फिर्यादी बाळासाहेब नारायण तुपे (वय ६६) यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री ८:०० वाजता त्यांचे भाऊ प्रभाकर नारायण तुपे हे त्यांच्या प्रिन्स जनरल स्टोअर्स दुकानासमोर बसले होते. त्यावेळी आरोपी स्वप्निल बाळु ओव्होळ (रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन) याने “तुम्ही दुकानापुढे गोंधळ घालत बसत जाऊ नका,” असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली.
या कारणावरून स्वप्निल ओव्होळ याने प्रभाकर तुपे यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याने धारदार चाकूने प्रभाकर तुपे यांच्या पोटात तसेच हातावर वार केले. या हल्ल्यात प्रभाकर तुपे गंभीर जखमी झाले आहेत.
गुन्हा दाखल
या घटनेनंतर, आज दि. २६/११/२०२५ रोजी पहाटे ०२:२८ वाजता उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये आरोपी स्वप्निल ओव्होळ याच्याविरुद्ध गु. रजि. न. ३१२/२०२५ अन्वये BNS कलम १०९, ३५२, ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
सदर घटनेनंतर मा. उपविभागीय अधिकारी दौंड विभाग बापूसाहेब दडस, पोनि/सचिन वांगडे सो, सपोनि/बाजगिरे सो. यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजगिरे सो. करत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

