येरवडा पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी ! स्वतःच्या नावाच्या दहशतीसाठी तोडफोड करणारा फरार आरोपी अखेर गजाआड


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :- येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ७०६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८(१), १८९(२),१९०, १९१(२) सह भारतीय हत्यार कायदा ४, २५. क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ३, ७ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्यातील आरोपी पोलीस स्टेशन रेकार्डवरील असुन यापूर्वी मकोका अंतर्गत कारवाई होऊन जामीनावर बाहेर आला होता. जामीनावर बाहेर आल्यानंतर येरवडा परीसरात तोडफोड करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेची पोलीसांनी तात्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल करुन आरोपींना शोध सुरु केला होता. सदर प्रकरणी गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना तात्काळ ताब्यात घेणेबाबत मा. वरीष्ठांनी सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनांच्या अनुषंगाने श्री. सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग यांनी देखील सदरबाबत सुचना केल्या होत्या त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन तपास पथकाचे पो.अं. १०७४९ अमोल गायकवाड यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील आरोपी हा पवार वस्ती, लोहगाव भागात त्याच्या मित्राकडे येणार असलेबाबत खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, पो.अं.९८६६ शैलेश वाबळे, पो.अं. १२३४ नटराज सुतार, पो.अं. १०७४९ अमोल गायकवाड यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन संशयित इसमावर पाळत ठेवली परंतु सवरचा आरोपी हा शरीराविरध्दचे गुन्हे करुन गुंगारा देऊन पळून जाण्यात पारंगत असल्याने तो सहजासहजी मित्राला देखील भेटण्यास तयार होत नव्हता. त्याचेवर पाळत ठेवल्यानंतर तब्बल ०८ तासाच्या प्रतिक्षेनंतर सदर आरोपी हा त्याठिकाणी आल्यानंतर त्यास ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव समीर शब्बीर शेख, वय-२७, रा-जयजवाननगर, येरवडा, पुणे असे असल्याचे सांगितले. सदरचा गुन्हा हा स्वःतच्या नावाची दहशत करण्यासाठी तसेच फिर्यादी यांचेसोबत जुन्या भांडणाच्या रागातुन केल्याचे सांगितले. नमुद आरोपीस पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस स्टेशन येथे आणले असुन पुढील तपास सपोनि मिथुन सावंत हे करत आहेत.
सदरची कामगिरी श्री. अमितेश कुमार साो. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४. श्रीमती प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. अंजुम बागवान, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन, श्री. विजय ठाकर, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, श्रेणी पोउनि प्रदिप सुर्वे, पोहवा २८३८ महेंद्र शिंदे, पो.अं. ३९५९ मुकुंद कोकणे, पो.अं.९८६६ शैलेश वाबळे, पो. अं.१०४८६ बालाजी सोगे, पो.अं.९८११ भीमराव कांबळे, पो.अं. १२३४ नटराज सुतार, पो. अं.८८४२ अतुल जाधव, पो.अं. १७०२ अक्षय शिंदे, पो.अं. १०७४९ अमोल गायकवाड, पो. अं. १०२४७ संदीप जायभाय यांनी केलेली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!