विश्रामबाग पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी!पिस्तुल व काडतुस जवळ बाळगणारा आरोपी जेरबंद


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :-दि. १८/०४/२०२५ विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिस शेख यांना मिळाले बातमी वरुन फुटका बुरुज, शनिवार वाडा, शनिवार पेठ, पुणे येथील सार्वजनिक रोडवरुन इसम नामे आकाश दशरथ घोणे वय ३० वर्षे धंदा मटन शॉप रा. ९३३ भवानीपेठ, रामोशी गेट समोर, बक्कर कसाब मस्जिद मागे पुणे यास विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार यांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात अंदाजे ५०,०००/- रुपये किंमतीचे गावठी पिस्टल व एक काडतुस मिळुन आल्याने त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री संदिपसिह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त, श्री साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीमती विजयमाला पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तसेच मनोज बरुरे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अशोक माने, मयुर भोसले, सचिन कदम, सचिन अहिवळे, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, शिवा गायकवाड, अनिस शेख, साताप्पा पाटील, नितीन बाबर व सागर मोरे यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!