सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! विनंभग व अॅट्रोसिटी गुन्हयात पाहिजे आरोपीस उज्जैन मध्यप्रदेश येथुन केले जेरबंद
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :१ दि.२४/०३/२०२५ रोजी पहाटे ०४/१५ वाजण्याचे सुमारास पिडीत फिर्यादी घरी जात असताना दिपक शिवाजी ठाकर याने त्याचेकडे अलेल्या पिस्तुलाचा धाक दाखवुन फिर्यादी यांचा विनभंग केल्याने दिपक ठाकर याचे विरुध्द सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.११८/२०२५ भा. न्या. संहिता ७४,७८,३५१ (२), आर्म अॅक्ट कलम ३(२५), अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम २०१५ चे कलम ३(१) (w) (i) (ii).३(२) (va) आर्म अॅक्ट कलम ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा दाखल झाले पासुन पाहिजे आरोपी दिपक ठाकर हा भारतात वेगवेगळ्या ठिकाणी राहुन अस्तीत्व लपवत होता.
दि. १४/०४/२०२५ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे दिपक ठाकर हा उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी वास्तव्यास आहे.
अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पालीस निरीक्षक राहुल गौड यांना कळविली असता त्यांनी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांना कळवुन लागलीच तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस अंमलदार अमोल पवार, चंद्रकांत जाधव, प्रदिप रेणुसे यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी उज्जैन मध्यप्रदेश या ठिकाणी जावुन तांत्रीक विश्लेषण करुन आरोपी राहत असलेल्या लॉजची माहिती मिळवुन त्याठिकाणी वेषांतर करुन शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले. त्यास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव दिपक शिवाजी ठाकर, वय ४५ वर्ष रा. चव्हाणनगर धनकवडी पुणे असे सांगितले असुन त्याच्याकडे सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं ११८/२०२५ या दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वसात घेवुन चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात खाराकुंवा पोलीस स्टेशन उज्जैन मध्यप्रदेश येथे अटक करुन उज्जैन येथील मा. न्यायालयात हजर करुन ट्रांझिस्ट रिमांड घेऊन सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास राहुल आवारे, मा. सहा. पोलीस आयुक्त सो, स्वारगेट विभाग, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त सोो पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील सोो, पोलीस उपायुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील सोो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे सोो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, सुरेखा चव्हाण पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, चंद्रकांत जाधव, प्रदिप रेणुसे, सागर सुतकर, बजरंग पवार, किरण कांबळे, अमित पदमाळे, योगेश ढोले, महेश भगत, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

