वारजे माळवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगीरी ! सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळून २,७०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन ३ गुन्हे उघडकीस
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वारजे परीसरातील महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या सर्विस रोडवरुन महामार्गावर जाण्यासाठी मार्ग असल्याने अनेकदा या सर्विस रोडवर एकट्या दुकट्या महिलेला पाहुण मोटार सायकल वरुन जाणाऱ्या तरुणांनी सोनसाखळी खेचुन पळून गेल्याची उदाहरणे मागील काही वर्षापासुन आढळून येत आहे. यावर्षी अशाप्रकारच्या ४ घटना वारजे महामार्ग परीसरात सर्विस रोडवर घडलेल्या होत्या. त्याअनुशंगाने या गुन्ह्यांना प्रभावी पायबंद करण्यासाठी व असे गुन्हे उघडकीस आणण्याची गरज लक्षात घेवुन तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री संजय नरळे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले होते. सदर पथकाने मागील दोन आठवड्यांपासुन सातत्याने या अनुशंगाने वेगवगळ्या ठिकाणचे सि सि टी व्ही पाहणे, खबरी तयार करणे, लोकांच्या भेटी घेणे, जुन्या गुन्ह्यांचा अभ्यास करणे अशा प्रकारे काम करुन ती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत काईगडे यांना दिलेली होती व त्यावर काम चालु होते. सदर माहीतीच्या विश्लेषणातुनच पोलीस अंमलदार निखील तांगडे व अमित शेलार यांना अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या इसमाबाबत माहीती मिळाली की, सदरचे इसम हे एन डी ए ग्राउंड, वारजे येथे उभे आहेत. त्याबाबत सदरची माहीती वरिष्ठांना कळवून त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार अमित शेलार, ज्ञानेश्वर चित्ते, सागर कुंभार, बालाजी काटे, निखील तांगडे, अमित जाधव यांनी सदर इसमांचा शोध घेवुन एन डी ए ग्राऊंड येथून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारता त्यांनी त्यांचे नाव १) आकाश आंबादास आंधळे, वय २४ वर्षे, रा. दागंट पाटील नगर एक नंबर कमान, शिवणे, पुणे २) सुजल नरेश वाल्मिकी, वय २० वर्षे, रा. दांगट पाटील इस्टेट दुसरी कमान, शिवणे, पुणे असे सांगितले. सदर इसमांनी सुरुवातीला उडया उडवीची उत्तरे दिली. परंतु त्यांना पोलिसी भाषेत विचारपुस केल्यानंतर त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली असुन त्यांचेकडुन चोरी केलेले सोन्याचे दागिणे व गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल असा एकुण २,७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा.श्री संभाजी कदम, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३ पुणे शहर, मा.श्री भाऊसाहेब पटारे, सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री विश्वजीत काईंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मा.श्री निलेश बडाख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वारजे माळवाडी पोलीस स्टेशन यांचे देखरेखीत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार संजीव कळंबे, शरद वाकसे, अमित शेलार, ज्ञानेश्वर चित्ते, शरद पोळ, सागर कुंभार, बालाजी काटे, निखील तांगडे, योगेश वाघ, गोविंद कपाटे, अमित जाधव, गणेश शिंदे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

