आंतर जिल्हा घरफोडीचे गुन्हे करणा-या अट्टल ०३ आरोपीतांना खडकी पोलीसांनी २४ तासात केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

खडकी पोलिस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– फिर्यादी नामे, सचिन भैय्यालाल हटवार, रा. टाईप ३, अयप्पा मंदिरा शेजारी, रेंजहिल्स, खडकी पुणे यांनीत्यांचे राहते घर दि. २२/०२/२०२४ रोजी ०९/०० वा ते १२/३० वा. दरम्यानकुलुप लावुन बंद असताना सदर घराचे कडी कोयंडा तोडुन आतमध्ये प्रवेश करुन २,७०,०००/- कि.चे. सोन्याचे दागिने व ३,५००/- रु रोख रक्कम चोरी केलेबाबत फिर्याद दिलेने खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजिनं, ७९/२०२४ भा.द.वि. कलम. ४५४, ३८० दि.२२/०२/२०२४ रोजी गुन्हा नोंद आहे.

सदर गुन्ह्याचे मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशन तपासपथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक आण्णा गुंजाळ, पो.हवा, उध्दव कलंदर, पो.ना. संदेश निकाळजे, पो. अंग, अतुल इंगळे, प्रताप केदारी, ऋषिकेश दिघे असे सदर घटनास्थळ परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुजेट तपासणी करुन प्राप्त सी.सी.टी.व्ही. फुटेज प्राप्त करुन तसेच गोपनिय वातागीदारामार्फत बातमी काढली तसेच पो. अंम. ऋषिकेश दिघे यांना त्यांचे खास बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, सदर घरफोडी करणारे आरोपी हे तालुका कराड, जि. सातारा येथे चोरी केलेल्या माल विक्री करीता घेवून गेले असलेवावत माहीती मिळाल्याने सदरवावत मा. वरिष्ठांना अवगत केले असता मा. वरिष्ठांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिलेने, कराड जिल्हा सातारा येथे खडकी पोलीस ठाणेकडील तपासपथक स्टाफ सदर ठिकाणी जावून बातमी प्रमाणे खात्री करुन आरोपीचा माग काढून कराड येथुन आरोपी नामे, १) अनिल संजय बुद्देवार, वय २८ वर्षे, रा. बर्गे वरती, चिंबळी गांव, तात्या बगळे यांचे इमारतीमध्ये रुमनंबर ७, चाकण पुणे, २) रोशन अरविंद सोनावले, वय २६ वर्षे, रा. सदर, ३) संदिप हरी इंगळे, वय ३६ वर्षे, रा. सदर यांना ताब्यात घेवुन दाखल गुन्ह्याबाबत तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देवुन चोरीचा मुद्देमाल इसम नामे, दत्तात्रय भीमराव पवार, वय ४३ वर्षे, रा. कपिल गोलेश्वर पंचायत टाकीजवळ, तालुका कराड़, जि. सातारा याचेकडे दिलेबाबत सांगितल्याने सदर इसमांचा शोध घेवून त्यास देखील ताब्यात घेवून त्याचेकडून चोरीस गेले मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेली असून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन महिंद्रा स्कार्षीयो क्र. एम.एच. ५० ए ४४४५ तसेच अॅटो रिक्षा क्र. एम.एच. १४ एच.एम. ७८६२ ही जप्त करण्यात आलेली आहे. सदर आरोपीकडुन गुन्ह्यातील चोरीस गेले रु. १,७०,०००/- रु. सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरेलेले १०,००,०००/- रु. चे चार चाकी स्कार्षीयो तसेच १,००,०००/- रु. कि.चे. अॅटो रिक्षा क्र. एम.एच. १४ एच.एम. ७८६२ असे एकुण १२,७०,०००/- रु.कि.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेली आहे. सदर आरोपीताना गुन्ह्याचे पुढील अधिक तपासकामी अटक करण्यात आलेली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक आण्णा गुंजाळ हे करीत आहेत. अटक केलेल्या आरोपीतांपैकी, रोशन अरविंद सोनावले, वय २६ वर्षे, रा. बर्ग वस्ती, चिंबळी गांव, चाकण पुणे, यांचेवर यापुर्वी पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, मुंबई असे विविध ठिकाणी १५ पेक्षा जास्त घोडीचे गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी मा. प्रविण पवार साो, सह पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. मनोजकुमार पाटील सो, अपर पोलीस आयुक्त साो, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ ०४, पुणे शहर, मा. आरती बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर श्री. गिरीशकुमार दिघावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आण्णा गुंजाळ, पोलीस उप निरीक्षक तानाजी कांबळे, पो.हवा, उध्दव कलंदर, पो.ना. संदेश निकाळजे, पो. अंम. अतुल इंगळे, प्रताप केदारी, ऋषिकेश दिघे अनिकेत भोसले, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!