मॉनिगवॉकला जाणा-या महिलांचे मंगळसुत्र हिसकावणा-या अट्टल चोरटयास केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
अलंकार पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.२६/०८/२०२४ रोजी फिर्यादी ह्या बाबुराव पडवळ रोड, (डी.पी. रोड) कर्वेनगर पुणे येथे वाँकीगसाठी जात असताना त्याचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेले त्याबाबत त्यांनी अलंकार पोलीस स्टेशन गु.र.नं.१४०/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०९ (४) तक्रार दाखल केली होती.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन अलंकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता रोकडे यांनी तात्काळ गुन्हा नोंद करुन तपासाचे आदेश दिल्याने त्यानुसार पोलीसांनी गुन्हा नोंद करुन तपासास सुरूवात केली. तपास पथकातील पोलीस उपनिरी अभिजीत काळे व पोलीस अमंलदार यांनी घटनास्थळी भेट देवुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन पुढील तपास सुरू केला. दरम्यान दिनांक २९/०८/२०२४ रोजी डी पी रोड येथे सोनसाखळी चोरीच्या अनुषगाने तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी गस्त करीत असताना सोनसाखळी चोरीच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये साम्य असलेला एक २० ते २५ वय असलेला काळा टी शर्ट, निळया रंगाची ट्रॅक पॅन्ट व काळया रंगाची टोपी घातलेला इसम हा एका स्प्लेंडर मो. सायकलवर बसलेला आढळुन आला त्याचे जवळ जातच तो पळुन जावु लागल्याने त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने अक्षय गणपती तोडकर वय-२३ वर्षे सध्या रा-दत्तवाडी पुणे मुळ रा-करंबळी ता-गडहिंग्लज जि-कोल्हापुर असे सांगितले.
Advertisement
दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने त्याचेकडे तपास केला असता अक्षय तोडकर याने चैनस्नॅचिंग केल्याचे कबुल केल्याने त्यास पोलीसांनी गुन्हयात अटक करुन अलंकार पोलीस स्टेशन गु.र.नं. १४०/२०२४ भा.न्या. सं. कलम ३०९ (४) व वारजे पोलीस स्टेशन गु.र.नं.३३८/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०४ हे चैनस्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे कबुल केले व त्याचे कडुन चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची चैन, मोबाईल, मोटार सायकल असा १,९५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता रोकडे, यांच्या मार्दगर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत काळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश निंबाळकर, पोलीस अंमलदार पवार, यादव, सपकाळ, कुंभार, राठोड, शिंदे, शिवडकर यांनी केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

