पुण्यात भारी ! बिबवेवाडी पोलिस स्टेशन तपास पथकाची कामगिरी..पुजाऱ्याला किडनॅप करणाऱ्या सराईत आरोपीना कनार्टक येथे जावून पुजाऱ्याला सुखरूप सोडवून केली अटक


पंकेश जाधव संपादक 7020794626

बिबवेवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- सदरबाबत अधिक माहिती अशी की, दि. २९/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते दि.३०/९/२०२४ रोजी दरम्यान आरोपी १) रामु अप्पाराय बळुन, रा. त्रिकुंडी, ता.जत, रा.सांगली, २) दत्ता शिवाजी करे, रा. सदर ३) हर्षद सुरेश पाटील, रा. आसंगी, ता.जत, जि. सांगली व त्यांचे साथीदार हे फिर्यादी यांचे घरी आले. फिर्यादीचा मुलगा पुजारी स्वप्निल यांस भेटून विजापुर, कर्नाटक येथे घराची पुजा करायची आहे असे आमिष दाखवून, कर्नाटक येथे स्वप्नील लांडे, शुभम लांडे व त्यांचे सोबतचे शिष्य कृष्णा पांढरे, कन्हैया पांढरे, विशाल शेजवळ, पार्थ बेगुले, श्रीकांत सुतार व रोहन केंद्रे यांना घेवून जावून पिस्तुल व हत्यारांचा धाक दाखवून किडनॅप करून ५ कोटीच्या खंडणीसाठी त्यांना डांबून ठेवून ठेवल्याचे तक्रारीवरून बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १४०(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना तपास पथकाला आरोपी यांनी पुजारी व त्याचे शिष्यांना कर्नाटक येथे सिधनूर जवळ डांबून ठेवले असल्याची खात्रीशीर माहिती तपास पथकाचे प्रभारी पोउपनि अशोक येवले पोशी सुमीत ताकपेरे व जोतीष काळे यांना मिळाली असता त्यावरून वपोनि मंगल मोढवे यांनी तात्काळ सदरबाबत माहिती वरिष्ठांना कळवून लागलीच तपास पथकाचे प्रभारी पोउपनि अशोक येवले यांचेसह पोशी सुमीत ताकपेरे व जोतीष काळे यांना रवाना केले.

सिंधनूर, कर्नाटक येथे पोहचल्यानंतर स्थानिक पोलीसांची मदत घेवून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी गेले असता आरोपी यांनी पुजारी व त्याचे शिष्यांना एका निर्जन ठिकाणी असलेल्या बंद रूममध्ये डांबून ठेवल्याचे दिसून आहे. आरोपी यांचेकडे वेपन असल्याचे दिसून आले तरीदेखील वरील पथकाने त्यांच्या जीवाची पर्वा न करता घरास घेरा घालून रुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरामध्ये आरोपी व पोलीसांमध्ये झटापट झाली त्या झटापटीमध्ये आरोपी पळून जात असताना पोउपनि येवले, पोशि ताकपेरे व पोशि काळे यांनी स्थानिक पोलीसांच्या मदतीने त्यांना हत्यारासह ताब्यात घेवून पुजारी व त्याच्या ३ शिष्यांची सुखरूप सुटका केली. तसेच आरोपींनी आणखीन ४ शिष्यांना दुसरीकडे डांबून ठेवले होते त्यांची देखील शिताफीने सुटका केली. सदर आरोपी यांनी किडनॅप करण्याकरीता वापरण्यात आलेली बंदूक व इतर हत्यारे ताब्यात घेवून त्यांना बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करून गुन्हयात अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी यांनी सोलापूर, सातारा, सांगली याठिकाणी गुन्हे केले असून ते फरार असल्याचे निष्पन्न केले. आरोपींनी दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री मनोजकुमार लोंढे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त, श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा पोलीस आयुक्त, श्री. धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. मनोजकुमार लोंढे, तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप-निरीक्षक, श्री अशोक येवले, पोलीस अमंलदार संजय गायकवाड, संतोष जाधव, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, प्रणय पाटील, शिवाजी येवले, विशाल जाधव, नितीन कातुर्डे, अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!