पैठण खुले कारागृह येथील बंद्यांकरीता विविध अभिनव उपक्रम सुरू व 38 बंद्यांकरिता आकाश मुक्त……..


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज रोजी पैठण खुले जिल्हा कारागृह येथे मा. कारागृह उपमहानिरीक्षक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर श्री यु.टी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षा बंद्याची १४ वर्षीय मुदतपुर्व मुक्ततेसंबंधी सल्लागार मंडळाची (Advisory Board) बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर बैठकीला पोलीस उपअधीक्षक श्री. चौगुले, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. बेदरकर व कारागृह अधीक्षक श्री. धनसिंग कवाळे हे सदर बैठकीला सदस्य म्हणून हजर होते. सदर बैठकीमध्ये ३८ बंदयांची प्रकरणे शिफारशीसह मुदतपुर्व मुक्ततेकरीता मा. शासनास पाठविणेबाबत निर्णय घेण्यात आला.

आज रोजी मा.मुख्यालय, पुणे येथील मा.अपर पोलीस महासंचालक श्री. अमिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. जालिंदर सुपेकर यांचे मार्गदर्शनाखाली व आदेशाने पैटण खुले कारागृहास प्राप्त वाशिंग मशीनचे उद्घाटन मा. कारागृह उपमहानिरीक्षक श्री. यु.टी. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

सदर वाशिंग मशीनमध्ये शिक्षा बंद्याचे कपडे धुवून मिळणार असल्याने कैद्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पैठण कारागृहाच्या मुख्यप्रवेश द्वारासमोर कारागृह उद्योगनगरी चालू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जेन्ट्सपार्लर, शिवणकामाचे उद्घाटन मा. कारागृह उपमहानिरीक्षक श्री. यु.टी. पवार यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी श्री. बेदरकर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, श्री. चौगुले, उपअधीक्षक ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर, व श्री. धनसिंग कवाळे व इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. मा. कारागृह उपमहानिरीक्षक श्री. यु.टी. पवार यांनी श्रृखंला उपहारगृहास भेट देवून समाधान व्यक्त केले. संपूर्ण कारागृहात राउंड घेऊन कारागृह सुरक्षेचा आढावा घेतला.

मा. मुख्यालयाकडून प्राप्त वस्तूंची पाहणी करून मार्गदर्शन केले.आज रोजी पैठण खुले कारागृह येथे समता फाउडेशन, छत्रपती संभाजीनगर व पैठण खुले कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने बंद्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये २६२ बंद्याचे डोळे तपासणी करून उपचार देण्यात आले. तसेच समता फाउंडेशन मार्फत बंद्याचे आयुष्यमान कार्ड काढून मा. कारागृह उपमहानिरीक्षक श्री. यु.टी. पवार यांचे हस्ते बंदयांना वाटप करण्यात आले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!