देशी बनावटीचे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या विधीसंघर्षीत बालकास स्वारगेट पोलीसांनी घेतले ताब्यात


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.१७/०४/२०२५ रोजी २१/३० वा सुमारास श्री. युवराज नांद्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी मिनाताई ठाकरे वसाहत गुलटेकडी परिसरामध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करणेबाबत सहा. पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, तपास पथकातील पोलीस अंमलदार पो.हवा.७८९९ शिंदे, पो/अं ८२३७ टोणपे यांना आदेशित केले होते. त्यावरुन सदर पथक हे पेट्रोलिंग करीत असताना प्रशांत टोणपे व सुजय पवार यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, व्हेईकल डेपोजवळील गल्लीमध्ये एक इसम त्याने अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा फुल बाहीचा शर्ट त्यावर लाल गुलाबाच्या फुलाची प्रिंट असलेला, ग्रे रंगाची गुडघ्यावर व मांडीवर फाटलेली डिझाईन असलेली जिन्स पॅन्ट घातलेली आहे व तो कमरेस पिस्तुल लावुन उभा आहे. अशी बातमी मिळाल्याने त्यांनी सदर बातमीबाबत सहा. पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर यांना माहिती दिली असता त्यांनी लागलीच सदर बातमीबाबत आम्हांस कळवले असता, वपोनि यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करुन बातमी प्रमाणे इसम मिळुन आल्यास पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.

तद्नंतर सपोनि राहुल कोलंबीकर, दोन पंच व पोलीस स्टाफ असे पंचनाम्यासाठी लागणारी आवश्यक साधनसामग्री घेवुन खाजगी वाहनाने बातमीच्या ठिकाणी व्हेईकल डेपोजवळ अलीकडे वाहने थांबवून पायी-पायी चालत बातमीचे ठिकाणी जावुन पाहणी करता, सदर ठिकाणी बातमीप्रमाणे वर्णनाचा एक इसम हा संशयास्पदरित्या उभा असलेला दिसल्याने त्यांची व पंचाची खात्री झाली. त्यावेळी त्यांची नजरेला नजर झाल्याने तो पळुन जाण्याच्या तयारीत असताना त्याला घेराव घालुन जागीच २२/१० वा. पकडले. त्याच स्थितीत त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे कमरेस उजवे बाजूस एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल खोचलेले आढळले व त्याचे पँटचे उजवे खिशात ०१ जिवंत काडतुस असा एकुण २५,५००/- रुपये किंमतीचा माल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. सदर विधी संघर्षीत बालका विरुध्द स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं. १०८/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही मा.श्री. अमितेशकुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. रंजन कुमार शर्मा साो, सह-आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. प्रविण कुमार पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. स्मार्तना पाटील साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २ पुणे शहर, मा. राहुल आवारे साो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज नांद्रे, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. विकास भारमळ पोलीस निरीक्षक (गुन्हे), स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस हवालदार अश्रुबा मोराळे, पोलीस हवालदार हर्षल शिंदे, पोलीस अंमलदार, सुजय पवार, प्रशांत टोणपे, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, दिपक खंदाड, हनुमंत दुधे, यांनी एकत्र मिळुन केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!