गावठी पिस्टलसह एक इसम जेरबंद गुन्हे शाखा, युनीट ३ व वारजे माळवाडी पोलीस ठाणे यांची संयुक्त कामगिरी


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट ३ व वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.८/०२/२०२५ रोजी श्री. विश्वजित काईंगडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे व श्री. रंगराव पवार पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट ३ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ कडील अंमलदार वारजे माळवाडी पोलीस ठाणे हददीत घडणारे गंभीर गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणुन पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांना बातमी मिळाली की, एक इसम हा डी.पी रोड कर्वेनगर पुणे येथे रोडवर थांबलेला असुन त्याच्याकडे पिस्टल आहे अशी त्याचे वर्णनासह बातमी मिळाल्याने वारजे माळवाडी पोलीस ठाणे कडील पोलीस उप-निरीक्षक श्री संजय नरळे यांचेसह युनीट ३ कडील अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमीतील वर्णनाचे इसमाचा शोध घेतला एक इसम संशयीत रित्या हालचाल करीत असल्याचे दिसल्याने सदर इसमांस ताब्यात घेवुन त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव कुणाल सचिन घावरे वय.२८ वर्षे रा. नानासाहेब बराटे कॉलनी लेन नं १ कर्वेनगर पुणे असे असल्याचे सांगितले नंतर त्याची अंगझडती घेता त्याचे कब्जात कि. रु ४१,०००/-चे देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन पिवळया धातुचे दोन काडतुसे मिळुन आले ते पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे यांनी जप्त करून ताब्यात घेतले.
नमुद इसम नामे कुणाल सचिन घावरे वय. २८ वर्षे रा. नानासाहेब बराटे कॉलनी लेन नं १ कर्वेनगर पुणे याचे विरूदध अग्नीशस्त्र बाळगले बाबत पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर- ७०/२०२५ भारतीय शस्त्र अघि कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१) सह १३५. नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरचे अग्नीशस्त्र कोठुन आणले व कशासाठी जवळ बाळगले याबाबत पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक सचिन तरडे वारजे माळवाडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा.श्री निखिल पिंगळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर मा.श्री संभाजी कदम पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ पुणे शहर, मा.श्री. गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर, मा.श्री. भाऊसाहेब पठारे, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग यांचे सुचनेनुसार, विश्वजीत काईंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे व रंगराव पवार, पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा पुणे शहर, श्री. निलेश बडाख, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वारजे माळवाडी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पो.ह. विनोद भंडलकर, विनोद जाधव, गणेश सुतार, पोलीस अंमलदार हरिष गायकवाड, प्रतिक मोरे, इसाक पठाण, यांनी कामगिरी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!