बंडु आंदेकर टोळीतील मोक्यामधील पाहिजे आरोपीच्या आवळल्या मुसक्या


विशाल धाकतोडे पुणे प्रतिनिधी 
खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर 
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. सह. पोलीस आयुक्त, पुणे शहर व मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांनी पुणे शहर आयुक्तालयातील रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेचे आदेश दिलेले होते.
दिनांक ०८/१०/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेणेकामी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना संगमवाडी येथे आले असता मिळालेल्या बातमीप्रमाणे फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. १८२/२०२५. भा. न्या.सं.क. ३०८, ३०८(४), १११, ३(५) व मोका का.क. ३(१) (ii) व ३ (४) या गुन्हयातील पाहिजे आरोपी १) अमित सुधाकर बहादुरकर, वय ३६ वर्षे रा. स.नं. १३, दत्तमंदिराजवळ, सातववाडी, हडपसर, पुणे २) स्वप्निल विलास बहादुरकर, वय ३७ वर्षे रा. चमडी गल्ली, श्री स्वामी समर्थ अर्पाटमेंट, फलॅट नं.३, नाना पेठ, पुणे यांना ताब्यात घेतले असुन पुढील तपासकामी मा. सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त १, गुन्हे शाखा श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे, सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उप-निरीक्षक रामेश्वर पार्वे पोलीस अंमलदार प्रविण ढमाळ, रणजित फडतरे, नितीन कांबळे, अमोल आवाड, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, बालारफि शेख, रहिम शेख, अमर पवार व मंगेश गुंड यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!